Menu Close

राममंदिरासाठी आत्मदहन करण्याची चेतावणी देणारे महंत परमहंस यांना अटक

  • एका महंताच्या (उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री तथा महंत योगी आदित्यनाथ यांच्या) राजवटीत अन्य एका महंताला राममंदिर उभारण्यासाठी आत्मदहनाचा मार्ग अवलंबावा लागतो, तसेच त्यांचे योग्य समाधान न करता त्यांना अटक होणे कितपत योग्य ?
  • सरकार राममंदिरासाठी आंदोलन करणार्‍यांवर खटले भरते; पण हिंदूंना आश्‍वासन देऊनही राममंदिर उभारण्याविषयी चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या ! ही भाजप सरकारची भगवान श्रीरामाशी प्रतारणाच आहे !

अयोध्या (उत्तरप्रदेश) : राममंदिर उभारण्यासाठी आत्मदहन करण्याची चेतावणी देणारे तपस्वी छावणीचे महंत परमहंस यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयात उपस्थित केल्यानंतर त्यांना कारागृहात पाठवण्याची सिद्धता पोलिसांनी केल्याचे सांगण्यात आले. महंत परमहंस यांनी नुकतीच ‘भाजप सरकारने ५ डिसेंबरपर्यंत राममंदिर उभारण्याची घोषणा करावी अन्यथा ६ डिसेंबरला मी आत्मदहन करीन’ अशी चेतावणी दिली होती.

आत्मदहन करण्यासाठी महंतांनी स्वतःची चिताही रचली होती, तसेच त्याचे पूजनही केले होते. तथापि पोलिसांनी ही चिता हटवली. यापूर्वी महंत परमहंस यांनी राममंदिराच्या सूत्रावर उपोषणही केले होते. त्यांना तेथूनही हटवण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


सरकारने राममंदिर उभारणीची घोषणा न केल्यास ६ डिसेंबरला आत्मदहन करीन : महंत परमहंस महाराज दास

डिसेंबर ३, २०१८

  • आत्मदहन करून सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. त्यापेक्षा हिंदूसंघटन करून सरकारवर वैध मार्गाने दबाव आणणे आवश्यक !
  • महंतांना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! साधू, संत आणि महंत आदींना वारंवार आंदोलन करायला लावणारे; पण तरीही राममंदिराविषयी अवाक्षरही न काढणारे सरकार म्हणे हिंदुत्वनिष्ठ !

लक्ष्मणपुरी : अयोध्येत राममंदिराच्या उभारणीची ५ डिसेंबरपर्यंत घोषणा करा अन्यथा ६ डिसेंबरला सीतामढीतील मातीचा लेप लावून मी चितेवर बसीन आणि आत्मदहन करीन, अशी चेतावणी अयोध्येचे महंत परमहंस महाराज दास यांनी दिली. राममंदिराची उभारणी होत नसल्याच्या निषेधार्थ सीतामढी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘धिक्कार सभे’त ते बोलत होते. या वेळी त्यांनी ‘संघ, भाजप आणि विश्‍व हिंदु परिषद यांच्या कूटनीतीमुळेच अयोध्येत राममंदिराची उभारणी होत नाही’, असा आरोपही केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *