- आदिवासींचे धर्मांतर करण्यासाठी चिथावणी देणारे ख्रिस्ती मिशनरी पोलिसांच्या दृष्टीने गुन्हेगार नाहीत का ? गुन्हेगारांना पळून जाऊ देणार्या पोलिसांचीच सरकारने चौकशी करावी !
- हिंदूंनो, तुमचे धर्मांतर करण्यासाठी असे किती ‘जॉन चाऊ’ भारतात सर्वत्र फिरत असतील, याविषयी निद्रिस्त सरकारला काही ठाऊकही नसेल, याची निश्चिती बाळगा आणि असे धर्मांतर वैधमार्गाने रोखण्यासाठी कटीबद्ध व्हा !
पोर्ट ब्लेअर : आदिवासींचे धर्मांतर करण्यासाठी जॉन चाऊ या अमेरिकेच्या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला २ ख्रिस्ती मिशनर्यांनी सेंटिनल बेटावर पाठवल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. या मिशनर्यांमध्ये १ महिला आणि १ पुरुष यांचा समावेश आहे. पोलिसांनी या दोघांचीही चौकशी केली आहे; मात्र त्यांची ओळख उघड केलेली नाही. त्या दोघांनी देश सोडला असल्याची माहिती अंदमान निकोबार पोलीसदलाचे प्रमुख दीपेंद्र पाठक यांनी दिली. (जर हे दोघे जण चाऊ यांच्या हत्येस उत्तरदायी आहेत, तर त्यांना देश सोडून जाऊ कसे दिले ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
सेंटिनल बेटावरील आदिवासींचे धर्मांतर करण्यासाठी चाऊ १६ नोव्हेंबरला बेटावर गेले होते. तेथे प्रवेश करताच आदिवासींनी बाण आणि भाले मारून त्यांची हत्या केली. त्यानंतर किनार्यावरच त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांना अद्याप त्यांचा मृतदेह मिळालेला नाही. बेटावरील आदिवसींकडून आक्रमण होण्याची भीती असल्याने पोलिसांना बेटावर जाता आलेले नाही. ही आदिवासी जमात सहस्रो वर्षांपासून येथे रहात असून ती दुर्मिळात दुर्मिळ जमात आहे. त्यामुळे आदिवासींना त्रास होऊ नये, याचीही काळजी पथकला घ्यायची आहे.
दोघे मिशनरी चाऊ यांना भेटले होते. त्यांनीच चाऊ यांना या बेटावर जाऊन तेथील आदिवासींचे धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्यांनी चाऊ यांना भ्रमणभाष केल्याची माहितीही मिळाली आहे. या प्रकरणी चाऊ यांना या बेटावर नेणार्या ६ मासेमारांना अटक केली आहे. (चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या मासेमारांनीच चाऊ यांच्या हत्येची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी आतापर्यंत अनेकदा या बेटावर जाण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात त्यांना यश मिळाले नाही. आवश्यकता वाटल्यास बेटावर जाण्याचे पुन्हा प्रयत्न करण्यात येतील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात