यवतमाळ : प्रेम ही तीर्थयात्रा आहे, अशी टॅगलाईन देत हिंदूंच्या तीर्थयात्रांच्या उद्देशालाच हरताळ फासणार्या तसेच लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटावर बंदी घालावी, या मागणीसाठी स्थानिक दत्त चौक येथे २ डिसेंबरला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला २८० हून अधिक जिज्ञासूंनी स्वाक्षरीद्वारे पाठिंबा दर्शवला. आंदोलनामध्ये गुरुदेव सेवा मंडळाचे श्री. प्रभाकर डंभारे, युवा सेवा संघाचे श्री. गणेश साठे, महिला उत्थान मंडळाच्या साधिका तसेच सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी होते.
क्षणचित्रे
१. आंदोलनातील विषय ऐकून धर्मप्रेमी नागरिक स्वाक्षरी करण्यासाठी येत होते.
२. गुरुदेव सेवा मंडळाचे श्री. प्रभाकर डंभारे यांनी आंदोलनामध्ये पूर्णवेळ सहभागी होऊन नागरिकांचे प्रबोधन केले.
३. नागरिकांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, यासाठी बालसाधकांनीही प्रबोधन केले.
४. गोपनीय शाखेच्या पोलीस अधिकार्यांनी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना त्यांची नावे विचारली. (गेली कित्येक वर्षे सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्या, तसेच कायदा आणि सुव्यवस्था यांचा कोणताही प्रश्न निर्माण न करणार्या हिंदुत्वनिष्ठांची चौकशी करणार्या पोलिसांनी हा वेळ विधायक कामांसाठी वापरला तर त्याचे सार्थक होईल ! – संपादक)