निगडे (जिल्हा पुणे) येथे हिंदुराष्ट्र-जागृती सभेचे आयोजन !
निगडे (ता. मावळ, जिल्हा पुणे) : शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर, तसेच शबरीमला येथील श्री अय्यप्पा स्वामींचे मंदिर येथील प्रथा-परंपरा मोडण्याची स्थानिक महिला, तसेच भाविक यांची इच्छा नसतांनाही काही पुरोगामी महिलांनी न्यायालयाच्या आडून तेथील धर्मपरंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. हे केवळ हिंदूंच्या मंदिरांच्या संदर्भातच घडत आहे. धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी हिंदूसंघटन आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी केले. २५ नोव्हेंबर या दिवशी भैरवनाथ मंदिराजवळील मैदानात हिंदु जनजागृती समिती आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ७० धर्माभिमानी नागरिक उपस्थित होते. सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीमध्ये महिन्यातून एकदा धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे ठरवण्यात आले.
क्षणचित्रे
१. गावकरी श्री. जालिंदर थरकुडे यांनी वैयक्तिक कामे बाजूला ठेऊन एक पूर्ण दिवस सभेच्या प्रसारासाठी वेळ दिला.
२. गावाचे उपसरपंच श्री. रामदास चव्हाण स्वतः सभेच्या सिद्धतेमध्ये सहभागी झाले होते.
३. मूळचे निगडे येथील; परंतु सध्या पनवेल येथे रहाणारे धर्मप्रेमी श्री. विलास पुंडले हे सभेच्या प्रसारासाठी २ दिवस पनवेलहून गावात आले होते.