असे नीतीमत्ताहीन चर्च आणि पाद्री समाजाला नीतीमत्तेचे धडे देतात !
ऊठसूठ कुठल्याही कारणावरून हिंदूंचे धर्मगुरु आणि मंदिरे यांच्या विरोधात गरळओक करणारी अन् भारतातील ख्रिस्त्यांना विकली गेलेली प्रसारमाध्यमे हे वृत्त कदापि प्रसारित करणार नाहीत, हे जाणा !
व्हॅटिकन सिटी : चर्चमधील पाद्य्रांच्या समलैंगिकतेमुळे मी चिंतीत आहे, असे विधान ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी केले. एका स्पॅनिश पाद्य्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले. या पाद्य्राचे याविषयीचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. या मुलाखतीत पोप पुढे म्हणाले, ‘‘सध्या समलैंगिकता ही एक ‘फॅशन’ बनली आहे. समलैंगिकतेचे हे सूत्र अतिशय गंभीर आहे. पाद्य्रांनी स्वतःचे ब्रह्मचर्य राखणे आवश्यक आहे. यापुढे ‘कॅथॉलिक पाद्री’ म्हणून निवड करतांना संबंधित व्यक्ती समलैंगिंक नाही, याची निश्चिती करण्यात येईल. अशा समलैंगिक पाद्य्रांनी असे दुहेरी जीवन जगण्यापेक्षा त्यांनी पाद्रीपद सोडणे, हेच योग्य आहे. पाद्रीपदाचे प्रशिक्षण देणार्यांनीही प्रथम पाद्य्रांना मानवीय आणि भावनिक रूपाने परिपक्व करणे आवश्यक आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात