हिंदुपुराम (आंध्रप्रदेश) : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आंध्रप्रदेशच्या अनंतपुर जिल्ह्यातील हिंदुपुराम गावामध्ये तेथील माजी नगराध्यक्ष आणि धर्मप्रेमी श्री. बी.एस्. विद्यासागर यांच्या पुढाकाराने हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. स्थानिक धर्मप्रेमींनी या राष्ट्र-जागृती सभेच्या आयोजनाच्या अंतर्गत प्रचार-प्रसार, सभागृहाचे आरक्षण, भोजन आणि निवासव्यवस्था या सर्व सेवा उत्स्फूर्तपणे हाताळल्या.
श्री. बी.एस्. विद्यासागर म्हणाले, ‘‘अशा प्रकारच्या राष्ट्र-जागृती सभा १० गावांमध्ये आयोजित करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. हिंदुत्व बलशाली बनवण्याच्या दृष्टीने गावागावांतील लोकांमध्ये मला जागृती करायची आहे.’’ या सभेचा सर्व खर्चही त्यांनीच केला.
क्षणचित्र
या सभेला १३८ किलोमीटर प्रवास करून एक ७३ वर्षीय वृद्ध महिला आली होती. ‘हिंदुपुराम गावामध्ये सभा आहे’, हे कळल्यावर महिलेने तिच्या मुलीला ‘सभेला मला घेऊन जाण्याची व्यवस्था कर अन्यथा मी बसगाडीने जाणार’, असे सांगितले. त्यांची तीव्र तळमळ पाहून मुलीने त्या महिलेला चारचाकीची व्यवस्था करून सभास्थानी आणले. नंतर त्या महिलेचे छायाचित्र सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना दाखवले असता सद्गुरु काकूंनी त्यांचा आध्यात्मिक स्तर ६३ टक्के असल्याचे सांगितले.