- तुळजापूर येथे पोलीस आणि प्रशासन यांना निवेदनाद्वारे मागणी
- मुंबई येथे घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : धार्मिक तेढ निर्माण करणारा ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, प्रदर्शित झाल्यास सर्व हिंदू या चित्रपटाच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करतील आणि त्यानंतर होणार्या परिणामाला प्रशासन उत्तरदायी असेल, या मागणीचे निवेदन येथील ‘लोकजागर वाहिनी’, शंभुराजे प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने नायब तहसीलदार शितल कण्हेरे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांना देण्यात आले. या वेळी लोकजागर वाहिनीचे श्री. संजय सोनवणे, शंभुराजे प्रतिष्ठानचे श्री. तेजस माने, श्री. परिक्षित साळुंके, श्री. योगी खूनटाफले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विनायक माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. धनंजय बगडी, श्री. सुरेश नाईकवाडी, श्री. अमित कदम आदी उपस्थित होते. या चित्रपटाच्या विरोधात मुंबई येथे घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. ‘लव्ह जिहाद’मुळे सहस्रो हिंदू युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; तर सहस्रो युवती बेपत्ता आहेत. केदारनाथ चित्रपटाच्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिल्याप्रमाणेच आहे.
२. या चित्रपटामुळे समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान केदारनाथ या तिर्थक्षेत्राची विटंबना होत आहे, त्यामुळे जनभावनेचा उद्रेक होण्यापूर्वी त्यावर बंदी घालावी.