दुष्काळाच्या कारणामुळे हंपी उत्सव रहित करणारे कर्नाटकमधील हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार लाखो रुपये खर्च करून टिपू सुलतानची जयंती साजरी करते, हे लक्षात घ्या !
बेंगळूरू : केवळ लांगूलचालनासाठी आणि प्रतिष्ठेसाठी टिपू सुलतानची जयंती उत्साहाने साजरी करणार्या कर्नाटक सरकारने हंपी उत्सव मात्र साजरा करण्यास निरुत्साह दाखवला आहे. दुष्काळाचे कारण पुढे करत हंपी उत्सव रहित करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या विषयी बोलतांना बळ्ळारी जिल्ह्याचे पालकमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले, ‘‘राज्यातील १०० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे; म्हणून हंपी उत्सव साजरा न करण्याचे सरकारने ठरवले आहे.’’
या उत्सवात क्रीडा, साहस दर्शवणारे कार्यक्रम, विविध पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन, कला-संस्कृती प्रदर्शन, महिलाकेंद्रित कार्यक्रम आदी आयोजित करण्यात येतात. या उत्सवात अन्य राज्यांतील कलाकारही उत्साहाने सहभागी होतात. शासनाच्या निर्णयामुळे त्यांचीही निराशा झाली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात