हिंदूबहूल पनवेल शहर ख्रिस्ती मिशनर्यांच्या विळख्यात
हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हेच ख्रिस्ती मिशनर्यांना योग्य प्रत्युत्तर !
मुंबई : एकूण लोकसंख्येत केवळ २.१ टक्के इतकी ख्रिस्ती लोकवस्ती असलेल्या पनवेल शहरामध्ये १६ मोठी चर्च उभारण्यात आली आहेत. ‘हाताच्या बोटावर मोजण्याइतके ख्रिस्ती असूनही या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्च कशासाठी आहेत ?’, ‘हे चर्च उभारण्यासाठी निधी कुठून उपलब्ध झाला ?’, ‘त्यांचा आर्थिक कारभार कसा चालतो ?’, ‘यासाठी विदेशातून निधी येत आहे का ?’, असे अनेक प्रश्न स्थानिकांमध्ये उपस्थित होत आहेत. ‘या भागात धर्मांतराच्या कारवाया चालू झाल्या असून त्यांंकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे’, अशी येथील स्थानिक हिंदूंची मागणी आहे. मोठ्या प्रमाणात उभारलेले चर्च पहाता हिंदूबहुल असलेले पनवेल शहर ख्रिस्तीबहुल होऊन हिंदू अल्पसंख्यांक होण्याची भीती स्थानिक हिंदु समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
चर्च अवैध असल्यास चालकांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात यावा ! – अजयसिंह सेंगर, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन
ज्या ख्रिस्त्यांनी भारतियांना गुलाम केले, त्या ख्रिस्त्यांचा मताधिकार काढून घेतला पाहिजे; कारण ते हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. अशा ख्रिस्त्यांना मताधिकार देणे, हा काँग्रेसचा देशद्रोह आहे. ख्रिस्ती हा विदेशी धर्म आहे. विदेशींना कदापि मताधिकार नसतो. सौदी अरेबियात जन्महिंदूंना मताधिकार नाही. राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भारतातही मोदीसाहेबांनी हिंदुद्रोही कार्य करणार्या ख्रिस्त्यांचा मताधिकार काढून घ्यावा. ख्रिस्ती मिशनर्यांचे लक्ष्य मुसलमान नाहीत, तर भोळेभाबडे हिंदू आहेत. सरकारने चर्चचेही सरकारीकरण करून त्यांवर प्रशासक नेमावा. चर्चच्या आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण करून विदेशातून पैसा येणार्या चर्चच्या चालकांवर देशद्रोहाचा खटला प्रविष्ट करण्यात यावा.
‘पनवेल धर्मांतराचे केंद्र आहे का’, याचे अन्वेषण व्हावे ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पनवेल येथे १६ चर्च निर्माण होणे, ही गंभीर गोष्ट आहे. ‘एवढे अवाढव्य चर्च पनवेलमध्ये बांधण्याचा उद्देश काय आहे ?’, ‘त्यांना प्रशासनाने अधिकृत अनुमती दिली आहे का ?’, या सर्वांचे योग्य अन्वेषण व्हायला हवे. एकीकडे सरकार मंदिरांतील धन सामाजिक कामांसाठी वापरत आहे; मात्र चर्चमधील पैसे घेत नाही. महाराष्ट्र शासनाला आवाहन आहे की, नेहमी मंदिरातून पैसा घेता. कधीतरी या चर्चमधून पैसा घेतला पाहिजे. शासनाने लवकरात लवकर राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा आणि त्यावर प्रभावीपणे कार्यवाही करावी.
पनवेल परिसरातील चर्चची सूची
- १. सेंट जॉर्ज फॉरेन चर्च, सेक्टर १८ ए, नवीन पनवेल
- २. सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च, पनवेल रेल्वेस्थानक रस्ता
- ३. सेंट पीटर मार थोमा चर्च, सेक्टर ५, नवीन पनवेल
- ४. सेंट फ्रान्सिस चर्च, स्पर्श हॉस्पिटलजवळ, पनवेल
- ५. बिलिव्हर चर्च, कोळखे, पनवेल
- ६. सेंट जॉर्ज जे सो ओ चर्च, आदई, पनवेल
- ७. सेंट सेबॅस्टियन चर्च, सेक्टर ८, कळंबोली, पनवेल
- ८. होली स्पिरिट चर्च, सेक्टर ११, कळंबोली, पनवेल
- ९. बीलिवर ईस्टन चर्च मुंबई डायोस, कोळखे गाव, पनवेल
- १०. द पॅन्टेकोस्टल चर्च, पळस्पे गाव, पनवेल
- ११. पनवेल ए जी चर्च, सेक्टर १०, नवीन पनवेल
- १२. मसिहा चर्च, रत्नदीप हॉटेलच्या मागे, पनवेल बसस्थानकाजवळ
- १३. सेंट फ्रान्सिस चर्च सीएएन आय डायोस, शिवाजी रोड, पनवेल
- १४. न्यू पनवेल चर्च, फायर ब्रिगेड जवळ, नवीन पनवेल
- १५. मेरी माता चर्च, सेक्टर ३५, कामोठे, पनवेल
- १६. सेंट जॉर्ज ऑर्थोडॉक्स चर्च, सेक्टर १२, कळंबोली
या चर्चची नावे ‘गूगल’वर सर्च करून पाहिल्यास यांतील बहुतेक चर्चच्या इमारती भव्य असल्याचे दिसते. या चर्चमधून आर्थिक आमीष दाखवून धर्मांतर होत असल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात येत असून या प्रकरणी अन्वेषण करण्याची मागणी करण्यात येत आहे.
वाचक आणि धर्मप्रेमी हिंदू यांना आवाहन !
आपल्या परिसरात ख्रिस्ती लोकसंख्येच्या तुलनेत किती चर्च आहेत, दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत आहे का, याविषयीची माहिती कळवा ! ख्रिस्त्यांचे हिंदुविरोधी षड्यंत्र उघड करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
संपर्कासाठी पत्ता : संपादक, सनातन प्रभात, सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.
दू.क्र. : (०८३२) २३१२६६४, ई-मेल : [email protected]
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात