हिंदूंना धर्मापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र हिंदु राष्ट्र-जागृती सभेमुळे लक्षात आले ! – ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया
बडनगर (उज्जैन) : स्वातंत्र्यानंतर हिंदूंना धर्मापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र हिंदु राष्ट्र-जागृती सभेमुळे लक्षात आले. आजपर्यंत आम्हाला हे कुणीही सांगितले नव्हते. आता याविषयी आम्ही इतरांमध्ये जागृती करणार, अशी प्रतिक्रिया उज्जैन येथील बानियाखेडी आणि कोठडी गावांतील लोकांनी व्यक्त केली. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी संयुक्तपणे हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित केली होती. गावातील श्रीराम मंदिरामध्ये अलीकडेच ही सभा घेण्यात आली. यामध्ये ७० पेक्षा अधिक ग्रामस्थ सहभागी झाले होते.
या सभेमध्ये हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी ‘हिंदूंची वर्तमान स्थिती आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर समितीचे राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर सर्वांना संबोधित केले. या सभेला कोठडी गावातील सर्वश्री कमलसिंह अंजना, राहुल अंजना, नारायणदास बैरागी, दशरथ अंजना आणि बानियाखेडी गावातील सर्वश्री ईश्वरदास बैरागी, कालुदास बैरागी, चंदनसिंह अंजना, सज्जनसिंह अंजना, कार्तिकसिंह यांचे विशेष सहकार्य लाभले. माजी सरपंच श्री. जयसिंह अंजना यांनी सभेच्या आयोजनमध्ये विशेष परिश्रम घेतले. सभेच्या ठिकाणी धर्माचरण, गोरक्षा, हिंदु राष्ट्र, मंदिरात देवाचे दर्शन कसे घ्यायचे, याविषयीचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घेतला.
0 Comments