- हिंदु संस्कृती नामशेष करण्याचे हे षड्यंत्र आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे असे हिंदु धर्मविरोधी निर्णय घेतले जातात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
- शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांना खोट्या प्रकरणात अटक करण्याचे पाप तत्कालीन अण्णाद्रमुक सरकारने केले होते ! त्यामुळे हिंदु संस्कृतीवर घाला घालणारे असे निर्णय सध्या सत्तेत असलेल्या त्याच पक्षाच्या सरकारने घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही !
- तमिळनाडूमधील अल्पसंख्यांक समूदायातील मुलांवर धार्मिक बंधने घालण्याचे धारिष्ट्य अण्णाद्रमुक सरकारने केले असते का ?
चेन्नई : तमिळनाडू सरकारच्या शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये मुलींना पायात पैंजण आणि केसांत फूल घालण्यावर बंदी घातली आहे. यामागचे कारण स्पष्ट करतांना ‘पायातील पैंजणीमुळे आवाज आणि केसांतील फुलांचा सुगंध यांमुळे लक्ष विचलित होते’, असे सांगण्यात आले आहे. (असे लक्ष विचलीत होऊन मुलांच्या शिकण्यावर परिणाम झाला, अशी शिक्षणमंत्र्यांकडे उदाहरणे आहेत का ? बंदी घालण्यासाठी दिलेली कारणे हास्यास्पद असून यातून शिक्षणमंत्र्यांचा हिंदुद्वेषच दिसून येतो. जग हिंदु संस्कृतीकडे आकर्षिले जात असून भारतात असे निर्णय होणे दुर्दैवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याविषयीचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. यापूर्वी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री के.ए. सेनगोट्टायन् यांनी एका कार्यक्रमात बोलतांना याविषयीचे वक्तव्य केले होते. राज्यात मुलींसाठी बंदी लागू करण्यात आली आहे; मात्र मुलांच्या पेहरावाविषयी कोणतेच निर्देश देण्यात आलेले नाहीत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात