खारघर (नवी मुंबई) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
खारघर : सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी संस्थांना अपकीर्त करण्यासाठी विविध यंत्रणांद्वारे आणि विविध मार्गांनी षड्यंत्र रचले जात आहे. असे असले तरी या संघटना भगवद्गीतेतील ‘सत्यमेव जयते’ या वचनानुसारच वाटचाल करीत आहेत, यामुळेच सर्व जात, पात, प्रांत, पक्ष, भेद विसरून हिंदु म्हणून एकत्र येत आहेत आणि यातूनच पुढे हिंदु राष्ट्र येईल. समाजात निःस्पृहपणे धर्माचे कार्य करणे, सर्वांनी एकत्रित होणे आणि हिंदूंचा आवाज प्रखर होणे हीच विरोधकांची खरी पोटदुखी आहे. हीच भीती सर्व प्रकारच्या विरोधकांना खुपते आणि मग खोटे पुरावे, ‘मीडिया ट्रायल’ असे प्रकार चालू होतात, त्यामुळे पुढे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघर्षाशिवाय पर्याय नाही, असे उद्गार हिंंदु जनजागृती समितीचे श्री. निलेेेश देशमुख यांनी काढले. खारघर येथील डेली बाजार, सेक्टर १३ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे स्थानिक प्रमुख आंदोलनाला भेट देऊन गेले.
संसदेत हिंदु धर्माच्या प्रथा-परंपरांचे रक्षण करण्याचा कायदा करावा ! – सौ. ममता देसाई
शबरीमला मंदिर प्रकरणात न्याययंत्रणा एका अन्य धर्मीय याचिकाकर्त्याचे ऐकतात, मात्र लाखों श्रद्धाळूंच्या भावनांना केराची टोपली दाखवली जाते. तरीही ५ लाखांहून अधिक हिंदु भक्त संघटित झाले आणि श्रद्धेचा विजय झाला; मात्र एवढ्याने कार्य होणार नाही. संसदेत हिंदु धर्माच्या प्रथा-परंपरांचे रक्षण करण्याचा कायदा करणे आवश्यक आहे. या देशात बहुसंख्याकांना हीच वागणूक मिळणार असेल, तर हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही, असे परखड मत रणरागिणी शाखेच्या सौ. ममता देसाई यांनी या वेळी व्यक्त केले.
उपस्थित संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी
स्वराज्य मावळा प्रतिष्ठानचे श्री. गुरुनाथ मुंबईकर, शिवमंदिराचे श्री. आत्माराम पाटील, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. हेमंत मोरे, ह.भ.प. लक्ष्मण जाधव आणि इटरर्नल हिंदू संघटनेचे सदस्य.