डोंबिवली येथे योग वेदांत समिती आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा
डोंबिवली : इतर धर्मांमध्ये मनुष्याला स्वर्ग प्राप्त होतो; पण हिंदु धर्मामध्ये मनुष्याला मोक्षापर्यंत म्हणजे जीवन-मरणाच्या पलीकडे नेले जाते. काँग्रेस शासनाने संविधानात ‘सेक्युलर’ हा शब्द घालून फक्त हिंदूंनाच धर्मनिरपेक्ष बनवले आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्यांना सुखसुविधा दिल्या. देशातील एकही ख्रिस्ती किंवा मुसलमान स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत नाही; पण हिंदु मात्र स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतो आणि धर्माचरणापासून वंचित रहातो, तर आता हिंदूंनी देखील स्वतःला धर्मनिरपेक्ष नव्हे, तर आम्ही धर्मसापेक्ष आहोत, असे म्हणावे. सेक्युलॅरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता, नव्हे तर पंथनिरपेक्षता असा आहे. हिंदु जर जागृत आणि एकत्रित असेल तर तो शासनालाही झुकवू शकतो, हे शबरीमला मंदिराच्या आंदोलनातून दाखवून दिले आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी यांनी केले. ते योग वेदांत समिती आणि हिंदु जनजागृती समितीद्वारे डोंबिवली येथील संत श्री आसाराम बापू सत्संग भवन येथे ९ डिसेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. सभेला योग वेदांत समितीचे साधक आणि सनातन प्रभातचे वाचक असे १०० हून अधिक धर्माभिमानी नागरिक सभेला उपस्थित होते. योग वेदांत समितीच्या साधकांनी सभेची पूर्ण सिद्धता केली !
ठळक !
१. ‘हिंदु राष्ट्र’ हा विषय सर्वांना आवडला आणि ‘हिंदु राष्ट्र या संकल्पनेचा प्रसार होण्यासाठी प्रयत्न करू’, असे उपस्थितांनी सांगितले.
२. सभेनंतर झालेल्या बैठकीत सर्वांनी ‘नियमित एकत्र येऊन उपक्रम राबवू’, असे ठरवले.