Menu Close

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ७० वर्षीय साधूची निर्घृण हत्या

हिंदूंच्या तीर्थक्षेत्रीच संत-महंत असुरक्षित !

साधु-संतांच्या हत्येच्या विरोधात तथाकथित मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! साधु-संतांच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

मथुरा (उत्तरप्रदेश) : जिल्ह्यातील कोसीकला येथे अज्ञातांकडून एका मंदिरातील साधूची हत्या करण्यात आली. कमलदास उपाख्य हरदेवगंज (वय ७० वर्षे) असे त्यांचे नाव आहे. हे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे.

प्राप्त माहितीनुसार कोसीकला येथील रामनगर ‘रेल्वेलाईन’जवळ श्री महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात कमलदास उपाख्य हरदेवगंज हे नित्य पूजा करत होते. ८ डिसेंबरला सकाळी नेहमीप्रमाणे भाविक या मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांना कमलदास कुठेही दिसले नाहीत. त्यांतील काही भाविकांनी तेथेच बाजूला असलेल्या त्यांच्या खोलीत डोकावले. तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. ही बातमी पसरताच भाविक मोठ्या संख्येने मंदिरात एकत्र आले. त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस अधिकारी जगदीश कालीरमन यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर सांगितले की, कमलदास यांचा मृतदेह पहाता, त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी आक्रमण करून त्यांची निर्घृण हत्या केल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या खोलीत सर्वत्र रक्त होते. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करून घटनेची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. साधू कमलदास हे अनेक वर्षांपासून या मंदिरात पूजा करत होते.

मासातील दुसरी घटना

नोव्हेंबर मासात चौडरस येथील एका मंदिरात रहाणार्‍या साधूची अज्ञातांनी अत्यंत अमानुषपणे हत्या केली होती. पोलीस अद्यापही या प्रकरणाचा छडा लावू शकलेले नाहीत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *