Menu Close

पिंप्रीराजा (जिल्हा संभाजीनगर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा

हिंदु राष्ट्र स्थापण्याचा निर्धार करून पिंप्रीराजा येथील धर्मप्रेमी युवकांनी केले हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन !

संभाजीनगर : हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी आपल्याला संघर्ष आणि संघर्षच करावा लागेल. हिंदु राष्ट्र आपल्याला भेट म्हणून कोणी देणार नाही. धर्मासाठी एकत्र यायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. येथील पिंप्रीराजा येथील श्री विठ्ठल मंदिर सभागृहात ते बोलत होते. ‘सर्व हिंदूंनी एकत्रित  येऊन आजपासून ‘औरंगाबाद’ला ‘संभाजीनगर’ म्हणण्याचा निर्धार केला पाहिजे’, असेही त्यांनी सांगितले. सभेला ३०० हून अधिक धर्मभिमान्यांची उपस्थिती लाभली.

क्षणचित्रे

१. वक्त्यांसह ५० हून अधिक तरुण युवक गावाच्या वेशीपासून सभास्थळी घोषणा देत आले.

२. सभेची पूर्ण सिद्धता धर्मप्रेमी युवकांनी केली.

३. सभेला तरुण वर्गाची उपस्थिती अधिक होती.

४. सभेनंतर बैठकीला ५० हून अधिक युवकांचा प्रतिसाद

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *