Menu Close

तेलंगणमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांचा १७ सहस्रांहून अधिक मताधिक्याने विजय !

भाग्यनगर : तेलंगणमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे उमेदवार श्री. टी. राजासिंह यांचा गोशामहल मतदारसंघातून दणदणीत विजय झाला. श्री. राजासिंह यांना ६१ सहस्र ८५४, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे उमेदवार एम्. मुकेश गौड यांनी ४४ सहस्र १२० मते मिळाली. त्यांनी गौड यांचा १७ सहस्रांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. तेलंगणमध्ये टी. राजासिंह यांच्या रूपाने भाजपला मिळालेला हा एकमेव विजय आहे. श्री. टी. राजासिंह यांनी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मजागृती सभांमध्ये वक्ता म्हणून वेळोवेळी सहभाग घेतला आहे.

सातत्याने हिंदुहितासाठी लढणारे श्री. टी. राजासिंह यांचे अभिनंदन !

श्री. राजासिंह यांनी हिंदुहिताला प्राधान्य न देणार्‍या भाजपशी प्रसंगी फारकत घेण्याची सिद्धता दर्शवली; मात्र हिंदुत्वापासून त्यांनी कधीही फारकत घेतली नाही ! त्यांच्यातील जाज्वल्य हिंदुत्व, हिंदु बांधवांसाठी काहीही करण्याची सिद्धता यांमुळेच हिंदूंनी त्यांना निवडून दिले. त्यांचा विजय म्हणजे विकासाच्या नावाखाली हिंदुत्वापासून फारकत घेणार्‍या भाजपच्या डोळ्यांत झणझणीत अंजन होय !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *