Menu Close

हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी संघटित झाले वणीजवळील टाकळखेडावासी !

वणी (यवतमाळ) : मारेगाव तालुक्यातील टाकळखेडा या गावी ५ डिसेंबरच्या रात्री हिंंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. ही सभा गावांतील ५ तरुणांनी पुढाकार घेऊन आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. लोभेश्‍वर टोंगे यांचे साहाय्य घेऊन आयोजित केली होती. त्यांनी गावकर्‍यांना संघटित केले. या वेळी लावण्यात आलेले क्रांतीकारकांचे आणि धर्मशिक्षणाचे प्रदर्शन पाहून ग्रामस्थ प्रभावित झाले. ‘धर्माचरणाचे महत्त्व आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. लहू खामणकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज्यकर्ते कशी हिंदूंची दिशाभूल करत आहेत आणि त्यांना धर्माचरणापासून दूर ठेवत आहेत याची उदाहरणे या वेळी त्यांनी सांगितली. या सभेच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री शेखर आवारी, प्रमोद धाणकी, दिलीप धाणकी, अनिल कोडापे, दिनकर अंबाडे, गौरव झाडे या तरुणांनी साहाय्य केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *