बमनापती (उज्जैन) : ‘हॅलो’ नाही ‘जय श्रीराम’ म्हणण्याचा, ‘शेकहँड’ नाही तर ‘नमस्ते’ म्हणण्याचा, मेणबत्ती विझवून नव्हे, तर दीप पेटवून जन्मदिन साजरा करण्याचा निर्धार हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये सहभागी झालेल्या युवकांनी केला. बमनापती (बडनगर, उज्जैन) येथील श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये ही सभा घेण्यात आली.
या सभेमध्ये हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांनी ‘हिंदूंची वर्तमान स्थिती आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर सर्वांना संबोधित केले. या सभेसाठी बमनापतीचे सरपंच श्री. सुमेरसिंह, श्री. जितेंद्र शर्मा, श्री. राहुल, श्री. मंजीत अंजना, श्री. अर्जुनसिंह राजपूत इत्यादी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. येथे लावण्यात आलेले धर्माचरण, गोरक्षण, हिंदु राष्ट्र, देवालय दर्शन यांविषयीचे प्रदर्शन मुख्य आकर्षण ठरले. शंखनादाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या सभेचे सूत्रसंचालन श्री. बालाराम शर्मा यांनी केले.