ज्येष्ठ शिवप्रेमी श्री. नितीनराजे शिंदे आणि श्री. मिलिंद एकबोटे यांना जिल्हाबंदी
भाजपच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था यांच्या नावाखाली हिंदुत्वनिष्ठांनी आणखी किती दिवस पोलिसांची मोगलाई सहन करायची ?
सातारा : १४ डिसेंबर या दिवशी शिवप्रतापदिन (अफझलखानवध दिन) असून सातारा जिल्ह्यात तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; मात्र शिवप्रतापदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने ७ हिंदुत्वनिष्ठांना तालुकाबंदी, तर २ हिंदुत्वनिष्ठांना जिल्हाबंदी केली आहे. (छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर बंदी आणायला हा भारत आहे कि पाक ? कायदा आणि सुव्यवस्था कुणामुळे बाधित होते, हे पोलिसांना ठाऊक नाही का ? सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांनी संघटित होऊन या विरोधात आवाज उठवायला हवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ज्येेष्ठ शिवभक्त श्री. नितीनराजे शिंदे आणि श्री. मिलिंद एकबोटे यांना जिल्हाबंदी करण्यात आली असून प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. काशिनाथ शेलार (मामा), अधिवक्ता शिरिष दिवाकर आदींसह ७ हिंदुत्वनिष्ठांना तालुकाबंदी घोषित करण्यात आली आहे. प्रतापगडसह वाई आणि कुडाळ (जिल्हा सातारा) येथेही शिवप्रतापदिन साजरा करण्यात येणार आहे.
कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहाण्यासाठी पोलीस अधिकार्यांना अधिकार प्रदान
१३ ते १५ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्यांना मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी कार्यक्रमासाठी जाणार्या-येणार्या मार्गातील व्यक्ती अथवा समूह यांचे वर्तन, हालचाली कशा असाव्यात, ध्वनीप्रदूषणासाठी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आदेशांचे पालन व्हावे, याविषयी आवश्यक ते निर्देश देण्याचे अधिकार संबंधित अधिकार्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख यांनी प्रदान केले आहेत. (अनधिकृत मशिदींवरील ध्वनीप्रदूषणावर कोणतीही कारवाई न करणारे पोलीस प्रशासन हिंदूंच्या उत्सवांवर मात्र कायद्याचा बडगा उगारून कोणती मर्दुमकी गाजवत आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात