राममंदिरावर चर्चा करण्याची शिवसेनेची लोकसभेत मागणी
नवी देहली : ५ राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसर्याच दिवशी शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत राममंदिरावर चर्चा घेण्याची मागणी केली; मात्र ती मान्य करण्यात आली नाही. यानंतर संसदेबाहेर शिवसेनेच्या खासदारांनी राममंदिराच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार !’, अशा घोषणा शिवसेना खासदारांनी संसद परिसरात दिल्या. १२ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू झाले आणि पहिल्याच दिवशी ही मागणी करण्यात आली.
Shivsena MPs demand Ram Mandir in Ayodhya. Demonstration at Parliament House today. #shivsena #pehlemandirphirsarkar #mandirwahibanayenge pic.twitter.com/EHP1cpDVOk
— Rahul Shewale – राहुल शेवाळे (@shewale_rahul) December 12, 2018
खासदार श्री. चंद्रकांत खैरे म्हणाले की, राममंदिर हा देशातील कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. सरकारने राममंदिरासाठी कायदा आणावा. आम्ही ही मागणी निवडणुकीच्या तोंडावर करत नाही. आम्ही यापूर्वीही राममंदिराचे सूत्र उपस्थित केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात