१३ जानेवारी या दिवशी ‘जी.एस्.ग्राउंड’ जळगाव येथे भव्य हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन
जळगाव : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ जानेवारी या दिवशी ‘जी.एस्.ग्राउंड’ येथे भव्य हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या प्रचारार्थ १० डिसेंबरला बोरावल (तालुका यावल) येथे पहिलीच ग्राम स्तरावरील हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या सभेला १५० धर्माभिमानी उपस्थित होते. मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम, हिंदु धर्मावर होणारे विविध आघात, पाश्चात्त्य संस्कृतीची हिंदु संस्कृतीवरील आक्रमणे आदी विषयांवर हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले. ‘हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता’ याविषयी श्री. उमेश जोशी यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन श्री. प्रणव नागणे यांनी केले. शेवटी सर्वांना १३ जानेवारीला अधिकाधिक संख्येने जळगावच्या सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनास आणि सात्त्विक उत्पादन कक्षास चांगला प्रतिसाद लाभला.
ठळक
१. सभेची संपूर्ण सिद्धता यावल येथे हिंदूसंघटन मेळाव्याला आलेल्या धर्मप्रेमींनी केली.
२. या सभेमुळे उत्साह वाढल्याने स्थानिक धर्मप्रेमींनी ‘अजून २ गावांत अशा सभेचे आयोजन करू’, असे सांगितले.