प्रभावी हिंदूसंघटन प्रक्रियेत धर्मशिक्षण हा महत्त्वाचा घटक ! – सुभाष कुळे, हिंदु जनजागृती समिती
लवेल : स्वातंत्र्यानंतर हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नष्ट करण्याचे कारस्थान शासनकर्त्यांनी केल्याने हिंदूंमध्ये स्वधर्माबद्दल प्रचंड अज्ञान आहे. परिणामी हिंदूंमध्ये धर्माविषयी उदासीनता निर्माण झाल्याने धर्माकरता हिंदू संघटित होत नाहीत. असंघटित राहिल्याने भारतात हिंदू बहुसंख्यांक असूनही स्वधर्मावर धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरण यांसारखी असंख्य आक्रमणे होत आहेत. हिंदूंवर होणार्या या आघातांविषयी प्रभावी उपायोजना करण्याची साधी दखलही शासन यंत्रणा घेत नाहीत. याकरता हिंदूंचे प्रभावी संघटन निर्माण करण्यासमवेत हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हा महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुभाष कुळे यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ फेब्रुवारी २०१९ या दिवशी चिपळूण येथे होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने लवेल पंचक्रोशीत धर्मप्रेमींच्या सहभागाने प्रसार आणि प्रचार चालू करण्यात आला आहे. याअंतर्गत मेटे गावात ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत समितीच्या वतीने श्री. सुभाष कुळे यांनी ‘साधना आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या वेळी ते बोलत होते.
१० डिसेंबर २०१८ या दिवशी मेटे (पाटीलवाडी) येथे श्री. शंकर गावडे यांच्या निवास्थानी ही सभा झाली. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनही लावण्यात आले होते. या सभेचा ९६ धर्मप्रेमींनी लाभ घेतला. मार्गदर्शनात घेतलेल्या विषयाने प्रभावित होऊन धर्मप्रेमींनी तेथे पाक्षिक धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली.
यासभेच्या आयोजनात धर्मप्रेमी श्री. शंकर गावडे, श्री कृष्णा गावडे, श्री. रवींंद्र शिगवण, श्री दत्ताराम मोगरे, श्री. सोनु ओवरे, श्री. सुरेश मोगरे, श्री. विजय वीर यांनी महत्त्वाचा सहभाग घेतला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सर्वश्री दत्ताराम घाग आणि मधुकर मोरे उपस्थित होते.