नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : येथील मातंगपुरा भागातील हनुमान मंदिरातील मूर्ती ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता धर्मांध सय्यद सज्जाद सय्यद इब्राहिम याने जवळच्या नाल्यात फेकली. (हिंदूंनो, संघटित होऊन असा वचक निर्माण करा की, येथे पुन्हा कुठल्याही धर्मांधाला हिंदूंच्या देवळाकडे वर मान करून पहाण्याचे धैर्य होणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
सकाळी पुजार्याच्या हे लक्षात आल्यावर ठाणेदार मगन मेहत्रे आणि पुजारी मूर्ती कुठे गेली, याचा शोध घेऊ लागले. त्या वेळी त्यांना ती नाल्यात पडलेली दिसली. त्यानंतर त्यांनी दुग्धाभिषेक करून मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना केली. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शहरात निषेध मोर्चा काढून ‘बंद’चे आवाहन केले.
या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी म्हणाले, ‘‘हा धर्मांध आरोपी नेहमीच असे धार्मिक भावना भडकावणारे कार्य करत असतो आणि काही लोकांकडून ‘तो वेडसर असल्याने असे करतो’ असे सांगून प्रत्येक वेळी त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतो. प्रत्यक्षात आरोपी वेडसर नसून मुद्दाम असे कृत्य करत असतो.’’ (धर्मांधांच्या हिंदुद्वेषी कारवायांवर पांघरूण घालण्यासाठी त्यांना ‘वेडसर’ ठरवण्याची क्लुप्ती लढवली जात आहे. पोलीस हे लक्षात घेऊन संबंधित धर्मांधाच्या विरोधात स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? हिंदु सहिष्णु आहेत, म्हणूनच हे चालू आहे. धर्मांधांच्या संदर्भात असे करण्याचे धाडस कुणी करतो का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
सूर्यवंशी पुढे म्हणाले, ‘‘हिंदु-मुसलमान ऐक्याच्या गप्पा करणार्या तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी आणि स्थानिक मुसलमान समाजाने समोर येऊन या घटनेचा निषेध करायला हवा होता.’’ (धर्मांध असे करत असते, तर या देशात अशा घटना सहस्रो वर्षांपासून सातत्याने घडल्या असत्या का ? हिंदूंनीच आता संघटित होऊन या विरोधात आवाज उठवायला हवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्या धर्मांधाला आता अटक करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात