Menu Close

भाजपशासित हिमाचल प्रदेश सरकारकडून गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा !

  • गोहत्या रोखण्यासाठी देशभर गोहत्याबंदी कायदा न करता केलेले सर्व उपाय वरवरचेच आहेत !
  • भाजप सरकारने गोहत्याबंदी कायदा करण्याचे आश्‍वासन न पाळता गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देणे म्हणजे ‘गोरक्षणासाठी आम्ही काहीतरी करत आहोत’, हे जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करणे होय ! ही एकप्रकारे जनतेच्या डोळ्यांत भाजपपुरस्कृत धूळफेकच म्हणावी लागेल !

शिमला : भाजपशासित उत्तराखंडपाठोपाठ हिमाचल प्रदेश सरकारनेही गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला आहे. धर्मशाला येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार अनिरुद्ध सिंह यांनी हा प्रस्ताव विधानसभेच्या पटलावर ठेवला, तर सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी त्यास पाठिंबा दिला. (एका राज्यामधील काँग्रेसवाले गायीचा सन्मान करतात, तर उर्वरित भारतातील काँग्रेसवाले व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली गोहत्याबंदीला विरोध करतात, हे कसे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे हा प्रस्ताव लगेच संमत झाला.

उत्तराखंड सरकारने सप्टेंबर २०१८ मध्ये गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला होता. गोतस्करीला चाप बसवण्यासाठी, तसेच गोरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला होता. हा प्रस्ताव मांडणारे अनिरुद्ध सिंह म्हणाले, ‘‘गोमातेला धार्मिक महत्त्व आहेच; परंतु तिचे सामाजिक महत्त्वही फार आहे. गोमातेने संपूर्ण मानवजातीवर उपकार केले आहेत. तेव्हा तिचे रक्षण करणे, हे आपले कर्तव्य आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *