Menu Close

अवैध पशूवधगृहाविषयीच्या बातमीमुळे पत्रकारावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कडक कारवाई करा !

सोलापूर येथील हिंदुत्वनिष्ठांची जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे मागणी

(उजवीकडे) निवेदन स्वीकारतांना उपजिल्हाधिकारी संजय तेली आणि निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

सोलापूर : अवैध पशूवधगृहाविषयी बातमी प्रसारित केल्याच्या कारणावरून पत्रकार श्री. विजयकुमार बाबर यांच्यावर येथील धर्मांधांनी केलेल्या प्राणघातक आक्रमणाच्या विरोधात आक्रमणकर्त्यांवर कडक कारवाई करा, या मागणीसाठी येथील विविध हिंदुत्वनिष्ठांकडून निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. आनंद गोस्की, श्री. विजयकुमार कोंका, श्री. बाबुराव कोळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते.

८ डिसेंबर या दिवशी येथील विजापूरवेस परिसरात अवैध पशूवधगृह आणि तेथे होणार्‍या गोवंशहत्येविषयी बातमी प्रसारित केल्याच्या कारणावरून वृत्तवाहिनीचे पत्रकार श्री. विजयकुमार बाबर आणि त्यांचे सहकारी यांच्यावर येथील धर्मांध कसायांनी प्राणघातक आक्रमण केले होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *