देवाच्या कृपेने आणि साधू-संतांच्या आशीर्वादाने २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्र येणार ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
अंबरनाथ : रामायण होण्याआधी ते लिहिले गेले होते, कंसाच्या वध होण्यापूर्वी त्याची आकाशवाणी झाली होती, त्याचप्रमाणे साधूसंतांनी सांगितलेले आहे की, २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्र हे येणार आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी केले. ते पूर्वेतील विश्वकर्मा सभागृहात आयोजित हिंदु-राष्ट्र जागृती सभेत बोलत होते. आपण सर्वांनी राष्ट्र आणि धर्म यांची सेवा करून येणार्या हिंदु राष्ट्र स्थापनेत खारीचा वाटा उचलायला हवा. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध उपक्रमांत आपण कार्य करून भारतात हिंदु राष्ट्र निर्माण करूया, असे आवाहन त्यांनी उपस्थित हिंदूंना केले. या सभेला १०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी या सभेला उपस्थित होते.
सभेमध्ये उदय धुरी यांनी सांगितलेली अन्य सूत्रे
१. मेकॉलेची शिक्षणपद्धती आपल्या देशात लागू करण्यात आली आणि हिंदूंना त्यांच्या धर्मापासून लांब ठेवण्यात आले.
२. सरकारी अनुदानाने मदरशांमध्ये कुराण शिकवले जाते, ख्रिस्ती शाळांमध्ये बायबल शिकवतात; पण जेव्हा भगवद्गीता एका शाळेत वाटण्यात आली तेव्हा सर्वांनी ओरड करतात की, शिक्षणाचे भगवेकरण होत आहे.
३. हिंदूंचे मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले आहे; पण एकही मशीद किंवा चर्च यांचे सरकारीकरण झालेले नाही, अशी खंतही धुरी यांनी व्यक्त केली.
उपस्थित मान्यवर !
शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष श्री. सुनील चौधरी, भाजपचे संघटन सरचिटणीस श्री. आशिष पावसकर, शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. पुरुषोत्तम एकनाथ उगले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. खानची दल, भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या सौ. मंजू खानची दल, योग वेदान्त समितीचेे साधक श्री. सुभाष भाऊ वडतकर, डेक्कन एज्युकेशन स्कूलचे संस्थापक श्री. पूनालुर वसंतन, स्वदेशी जागरण मंचचे श्री. राजेश मिश्रा, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री. प्रदीप नवार, धर्माभिमानी आधुनिक वैद्य आर्.एल्. राव, श्री. सतीश गुडेकर, श्री. अनिल भोईर, श्री. र.घ. कुलकर्णी.
प्रतिक्रिया !
१. हिंदु जनजागृती समितीशी माझी ओळख नव्हती, याची मला खंत वाटते; पण यापुढे मला कार्य करायला आवडेल, अशी प्रतिक्रिया श्रीकांत यांनी दिली.
२. अधिवक्ता नारायण करमरकर म्हणाले ‘‘समितीच्या पुढच्या कार्यात सहभागी होण्याचा विचार आहे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा आहे.’’