Menu Close

मुलुंड (मुंबई) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा संपन्न !

हिंदु राष्ट्र स्थापनेपर्यंत सनातनचा एकही साधक स्वस्थ बसणार नाही ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

वैद्य उदय धुरी आणि दीपप्रज्वलन करतांना वैद्या सौ. दीक्षा पेंडभाजे

मुलुंड (मुंबई) : सध्या देशात होत असलेली धर्महानी पहाता धर्मकार्याची नितांत आवश्यकता असून हिंदुंसमोर उभ्या ठाकलेल्या अनेक समस्यांवर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन करणे. असे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन होेईपर्यंत सनातनचा एकही साधक स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या वक्त्या वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी येथे केले. मुलुंड येथील वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालय येथे १५ डिसेंबरला हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी हे ही उपस्थित होते. या सभेला ८८ धर्माभिमानी उपस्थित होते.

वैद्य उदय धुरी या वेळी म्हणाले की, गेल्या ७१ वर्षांमध्ये आपली संस्कृती, शिक्षण, तीर्थयात्रा, धार्मिक स्थळे आदींवर आक्रमण झाले आहे. सरकार मंदिर सरकारीकरणाच्या माध्यमातून मोठी मंदिरे कह्यात घेऊन त्यांतील देवनिधीचा वाटेल तसा उपयोग करत आहे. राममंदिर बनवण्यासाठी १०० कोटी हिंदूंना १८ कोटी मुसलमानांसमोर हात पसरावा लागत आहे. मुलुंडमध्ये इंदिरानगर, मेहुल या भागांत उघडपणे धर्मांतर होत आहे. ‘धर्मांतर बंदी’ आणि ‘लोकसंख्या नियंत्रण’ हे कायदे झाले पाहिजेत. यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

प्रतिसाद !

सभेनंतर झालेल्या बैठकीत धर्माभिमान्यांनी बालसंस्कारवर्ग घेण्याची तसेच त्यांच्या विभागात हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या आयोजनात सहभाग घेण्याची सिद्धता दर्शवली.

सहकार्य !

वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालयाच्या २०० विद्यार्थ्यांनी समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या क्रांतीकारकांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचा लाभ घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नलिनी चितळे यांनी शाळेचे सभागृह देऊन तसेच मुलुंड येथील डेकोरेटर श्री. चंद्रकांत माळी यांनी साहित्य देऊन सहकार्य केले.

उपस्थित मान्यवर !

या सभेला श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे सचिन केळुस्कर, शिवसेनेचे मुलुंडचे शाखाप्रमुख श्री. निलेश मोरे आणि श्री. अमोल संसारे हे उपस्थित होते. भाजपचे स्थानिक नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांनी सभेला भेट दिली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *