कल्याण येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
कल्याण : आज ख्रिस्ती प्रार्थनेच्या आडून ख्रिस्ती पंथाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी नित्य नवीन क्लृप्त्या वापरून हिंदूंना धर्मांतरीत करत आहेत. यासाठी हिंदूंनी जागृत राहून आणि संघटित होऊन लढा द्यायला हवा. कल्याण येथे बालसंस्कारवर्गाच्या आडून होणारे, तसेच उपनगरीय रेल्वेत होणारे संभाव्य धर्मांतर येथील जागृत हिंदूंनी रोखले आहे. असे प्रयत्न सातत्याने करून आपण हिंदूंना धर्मांतरापासून वाचवू शकतो. त्यासाठीच हिंदु जनजागृती समिती कार्य करत आहे. ख्रिस्ती मिशनर्यांचे षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदूंनी सज्ज होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे यांनी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले.
येथील पश्चिमेला अन्नपूर्णानगरात आयोजित करण्यात आलेल्या या सभेतील वरील विधानावर उपस्थित धर्माभिमान्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला आणि जणू संघटित होण्यासाठी सकारात्मक होकार दर्शवला.
आज ख्रिस्ती पंथीय प्रसार करून हिंदूंना धर्मांतरित करीत आहेत आणि धर्मांध हिंदु युवतींना प्रेमाच्या फसव्या जाळ्यात ओढून धर्मांतरीत करीत आहेत. यामुळे हिंदू अल्पसंख्यांक होण्याची वेळ आली आहे. या संकटापासून हिंदूंना सोडवण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. हिंदु स्त्रियांनी किमान कुंकू लावून आपली संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी येथे सभेला संबोधित करतांना केले.
या सभेचे सूत्रसंचालन श्री. महेश मुळीक यांनी केले. या सभेला अनुमाने १५० धर्माभिमानी उपस्थित होते. सभास्थानी गोपनीय शाखा आणि महिला पोलीस यांसह ३० पोलीस होते. पोलिसांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले.
सहकार्य
१. येथील ज्येेष्ठ नागरिक संघाचे श्री. देशपांडे आणि श्री. विजय वावू यांनी सभेला सहकार्य केले.
२. येथील शिक्षक श्री. पुराणिक यांनी सभेची चौकट फलकांवर लिहून धर्मकार्यात सहभाग नोंदवला.
उल्लेखनीय
१. अन्नपूर्णानगरीतील भूपतराव आजी यांचे संपूर्ण कुटुंब चित्रपटाला गेले होते; मात्र त्या सभेला आल्या होत्या.
२. एक रिक्शाचालकाने सभेचा विषय ऐकून सभेचे पत्रक स्वत:च्या रिक्शावर लावून प्रसार केला.