- भारतात मात्र अन्य पंथियांचे सण सरकारी पातळीवर साजरे होऊन सर्व कामकाज ठप्प ठेवले जाते !
- स्वतःच्या संस्कृतीच्या रक्षणार्थ चीनसारखा बाणेदारपणा भारतीय शासनकर्ते दाखवतील तो सुदिन !
बीजिंग : चीनने त्याच्या उत्तर भागातील लांगफांग या शहरात ख्रिसमसशी संबंधित साहित्याच्या विक्रीवर बंदी घातली. लांगफांग शहरात होणार्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर कचरामुक्त रहाण्यासाठी चीन सरकारने हा कठोर निर्णय घेतला. या निर्णयानुसार आता लांगफांग भागात ‘ख्रिसमस ट्री’ अथवा ‘सांताक्लॉज’ पोषाख विकता येणार नाही, तसेच कुठल्याही दुकानात ख्रिसमसशी संबंधित कोणत्याही साहित्याची विक्री करता येणार नाही. इतकेच नव्हे, तर या शहरात सुट्टीसाठी येणार्या पर्यटकांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सरकारी कर्मचार्यांना २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत कामावर रूजू होणे सक्तीचे करण्यात आले आहे.
तथापि प्रशासनाने मात्र हा निर्णय ख्रिसमस सण समोर ठेवून नव्हे, तर पुरस्कार वितरण सोहळा समोर ठेवून घेतला असल्याची मखलाशी केली आहे. चीनने देशातील नागरिकांना ख्रिसमस साजरा न करण्याची तंबी दिली आहे. ‘ख्रिसमस साजरा करणे, हे पाश्चात्त्य कुप्रथेचे अंधानुकरण असून त्यामुळे युवकांवर चुकीचे संस्कार होतात’, असेही चीनने म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात