वर्धा : वर्ष १९४७ पूर्वी भारत हे हिंदु राष्ट्रच होते. आज या राष्ट्राला ‘सेक्युलर’ म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य संबोधून हिरवा रंग फासला जात आहे. हिंदूंच्या मोठ्या मंदिरांचा पैसा मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यासाठी वापरला जातो, तर हिंदूंना मात्र त्यांच्या धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. सर्वपक्षीय राज्यकर्ते धर्मनिरपेक्षतेच्या नावाने अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत बहुसंख्य हिंदूंवर अन्याय करत आहेत. त्यामुळे पुन्हा हिंदूंना स्वाभिमानाने जगण्यासाठी आणि या देशात सुराज्य निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हितेश निखार यांनी ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’त केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ डिसेंबर या दिवशी सिंदी (रेल्वे) येथील विठ्ठल मंदिर सभागृहामध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ घेण्यात आली. या सभेला गावकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘हिंदूंमध्ये शौर्य जागरणाची आवश्यकता’ या विषयावर बोलतांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती चौधरी म्हणाल्या, ‘‘जेव्हा हिंदू जागृत झाले तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापन केले. गेली १४०० वर्षे परकीय आक्रमणांशी संघर्ष करत त्यांना पुरून उरलेला आपला हिंदु समाज आज शक्तीहीन झाला आहे. देशभरात शेकडो हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्या; मात्र दोन-चार पुरोगाम्यांच्या हत्या झाल्या, तर ‘हिंदु आतंकवाद’ म्हणून आवई उठवण्यात येते. हिंदू त्यांचे शौर्य प्रकट करत नाहीत; म्हणून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हा अन्याय चालू आहे.’’ सूत्रसंचालन सौ. वनिता फुसे यांनी केले. आभारप्रदर्शन श्री. ज्ञानेश्वर बेलखोडे यांनी मानले.