‘इलेक्शन’ नव्हे, ‘सिलेक्शन’ हवे ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
मुंबई : स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही देशाच्या समस्या न्यून झाल्या नसून त्या अधिक आणि बिकट झाल्या आहेत. न्यायालयात कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत, भ्रष्टाचाराने संपूर्ण व्यवस्था पोखरली आहे, बहुमताला मानणारी व्यवस्था ८० प्रतिशत हिंदूंच्या श्रीराम मंदिराच्या मागणीला मात्र दुय्यम मानून खटला वर्षानूवर्षे टाळते, तीच व्यवस्था आंतकवाद्यासाठी मध्यरात्रीही तत्पर होते, न्यायालयाने आदेश देऊनही त्यावर कृती केली जात नाही आणि नेता भ्रष्टाचारी निघाला, तरी त्याला जनतेला सहन करावे लागते, अशा असंख्य त्रुटी असलेली ‘इलेक्शन’ (मतदान) पद्धत अयोग्य असून पूर्वीची ‘सिलेक्शन’ (पात्रतेप्रमाणे निवड) पद्धतच योग्य आहे, असे प्रतिपादन श्री. सतीश कोचरेकर यांनी उपस्थित हिंदूंसमोर केले. अंधेरी (पू.) येथील श्री गणेश मंदिरासमोरील मैदानात १६ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. दोन पोलिसांनी संपूर्ण सभेचे भ्रमणभाषवर चित्रीकरण केले. पोलिसांचे एक चारचाकी वाहन पथक सभेपासून काही अंतरावर होते.
हिंदूंचे संघटन रोखण्यासाठी सनातनवर खोटे आरोप केले जात आहेत आणि हिंदुत्वनिष्ठांना नाहक हत्यांच्या आरोपात गोवले जात आहे; मात्र हे आरोप तपास यंत्रणांना सिद्ध करता न आल्यामुळे खोट्या आरोपाखाली अटक केलेल्या साधकांना जामीन मिळण्याची नामुष्की तपास यंत्रणांवर आली आहे, ही गोष्ट धर्माचा विजय आणि सनातनचे निर्दोषत्व सिद्ध करणारी आहे, असे प्रतिपादन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी या वेळी केले.
उपस्थित
या वेळी भाजपचे वॉर्ड क्र. ८१ चे अध्यक्ष श्री. शेखर तावडे, भाजप वॉर्ड क्र. ८१ चे महामंत्री श्री. अविनाश भागवत, भाजपचे मराठवाडा विकास आघाडीचे अध्यक्ष श्री. वसंत दहिफळे, युवा सेनेचे उपशाखा अधिकारी श्री. उमेश ठाकूर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. शिवराम राजापूरकर, प्रखर धर्मप्रेमी श्री. योगेश इलावडेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. संदीप सिंग, शिवसेनेचे गटप्रमुख श्री. विलास दळवी, तसेच माजी तहसीलदार श्रीकृष्ण गोसावी आदी मान्यवरांसह २०० धर्म आणि राष्ट्र प्रेमी या सभेला उपस्थित होते.
प्रतिसाद !
१. उपस्थित धर्मप्रेमींनी प्रत्येक शनिवारी धर्मशिक्षणवर्ग घेण्याची मागणी केली.
२. अजून २ सभा घेण्याचे आश्वासन उपस्थितांनी या वेळी दिले.
सहकार्य !
भाजपचे नगरसेवक श्री. मुरजीभाई पटेल, भाजपचे वॉर्ड क्र. ८१ चे अध्यक्ष श्री. शेखर तावडे, भाजपचे मराठवाडा विकास आघाडीचे अध्यक्ष श्री. वसंत दहिफळे, प्रखर धर्माभिमानी श्री. योगेश इलावडेकर, श्री. प्रसाद जागुष्टे आणि डेकोरेटर श्री. महेंद्र मराठे