समाजात द्वेष पसरवणार्या अशा संघटनांवर न्यायालय ताशेरे ओढते; पण ढिम्म भाजप सरकार केवळ बघ्याची भूमिका घेते ! भाजप सरकारला केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवरच कारवाई करण्यात रस आहे का ?
लक्ष्मणपुरी (लखनौ) : अयोध्येतील रामजन्मभूमीवर मुसलमानांना नमाजपठणाची अनुमती मागणारी ‘अल्-रेहमान’ या संघटनेची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. समाजात द्वेष पसरवण्याच्या हेतूने, तसेच न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यासाठीच ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती, अशा शब्दांत ताशेरे ओढत न्यायालयाने याचिकाकर्त्या ‘अल्-रेहमान’ संघटनेला ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला. ‘अल्-रेहमान’ ही संघटना उत्तरप्रदेशच्या रायबरेली येथील असून इस्लामचा प्रचार आणि प्रसार करणे, हे या संघटनेचे मुख्य काम आहे. काही दिवसांपूर्वी या संघटनेने याचिका करून त्यात, ‘अयोध्येत रामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याची अनुमती आहे’, असा दावा करत ‘मुसलमानांनाही नमाजपठण करण्याची अनुमती देण्यात यावी’, अशी मागणी केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात