उल्हासनगर येथे ख्रिस्ती धर्मांतराच्या विरोधात एकवटले हिंदुत्वनिष्ठ !
उल्हासनगर : येथील थाहरिया सिंग दरबार सभागृहात १९ डिसेंबरला हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरात होत असलेल्या ख्रिस्ती धर्मांतराच्या विरोधात संघटित होऊन सनदशीर मार्गाने लढा देण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या विभागातील हिंदु धर्मातील अनुमाने एक लक्ष सिंधी समाजाने ख्रिस्ती पंथाचा स्वीकार केला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक हिंदुत्वनिष्ठ या बैठकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बैठकीत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, राजकीय पक्ष, संप्रदाय, अधिवक्ते, पत्रकार आणि व्यापारी उपस्थित होते. या बैठकीला पू. गिलोचन सिंगजी महाराज आणि जसप्रीत सिंगजी यांचे शुभाशीर्वाद लाभले.
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या सहकार्याने सिंधी समाजाला धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची सिद्धता उपस्थितांनी व्यक्त केली. श्री. शशिकांत दायमा या वेळी म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उल्हासनगरच्या बाहेरचे असूनही प्रतिदिन येऊन येथील धर्मांतराचा अभ्यास करत आहेत. याविषयी त्यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यामध्ये सर्वोतोपरी सहभागी होऊन पाठिंबा देऊ.’’
उपस्थित मान्यवर
हिंदु जनजागृती समितीचे श्री. सागर चोपदार, श्री. अजय संभुस, श्री. अरुण कुलकर्णी, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, योग वेदांत समितीचे श्री. अभिषेक, श्री. महेश कृपलानी, अधिवक्ता मोनीष भाटिया, अधिवक्ता राहुल चतुर्वेदी, श्री. अनिल पांडे, श्री. प्रदीप दुर्गीया, श्री. लक्ष्मण दुबे, सौ. सिंधु शर्मा, श्री. मुकेश माखिजा, श्री. प्रकाश तहीलरमानी, श्री. सुशील तिवारी.
धर्माभिमान्यांचा कृतीशील प्रतिसाद !
१. अधिवक्ता राहुल चतुर्वेदी – धर्मांतरित झालेल्या लोकांना परत आणण्याचे काम आम्ही चालू केले आहे. या बैठकीमुळे एक आत्मविश्वास आला आहे. समितीच्या कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे.
२. श्री. पी.एस्. आहुजा – धर्मांतरित होणारे लोक हे आपल्या धर्मामध्ये काय अडचण आहे, हे धर्मांतरित झालेल्यांना विचारणे आवश्यक आहे. मी २५ कुटुंबियांचे दायित्व घेऊ शकतो !
३. श्री. धनंजय बोराडे, शिवसेना – धर्मांतरित लोक कट्टर असतात; पण हिंदु सहिष्णु आहेत. आता धर्मांतर वाढत आहे. आपल्याला विचार करायला हवा. यासाठी आपणा प्रत्येकाला धर्मप्रचारक व्हायला हवे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती यावेळेस कुठे असते ? जे धर्मांतरित झालेले आहेत, त्यांना परत आणण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. तसेच आपणसुद्धा करू !
४. श्री. साजन सिंग लबाना, वरिष्ठ पत्रकार, सुदर्शन वृत्तवाहिनी – उल्हासनगर येथे धर्मावर आघात होणार्या ज्या काही बातम्या असतील, त्या प्रामाणिकपणे, निर्भीडपणे मांडण्यास सुदर्शन टी.व्ही. तत्पर आहे.
५. श्री. परमानंद गेरेजा – येथे जे काही धर्मांतरित झालेले आहेत, यांची नाताळपूर्वी एक मिरवणूक निघते, त्या मिरवणुकीच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्म कसा मोठा आहे आणि हिंदु धर्माविषयी टीका करणारे, अशी काही पत्रके ते जागोजागी वाटत जात असतात. याला संघटितपणे विरोध व्हायला हवा.
६. सौ. रशिम पंज्वानी – धर्मांतरित बंदी कायदा यावा यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्याचे दायित्व घेईन.
सहभागी संघटना
हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना, विश्व हिंदु परिषद, सिंधी कौन्सिल ऑफ इंडिया, जय झुलेलाल सेवा संघर्ष समिती, प्रबळ संघटन, हेल्पइंग हँडस फौंडेशन, सिंधु सत्याग्रह, विश्व सिंधी समाज संघ, ब्राह्मण सभा, पू. आसारामजी बापू संप्रदाय, स्वराज्य हिंदुसेना, उल्हासनगर व्यापारी संघटना.
बैठकीत निश्चित करण्यात आलेली कृतीच्या स्तरावरील सूत्रे !
१. महाराष्ट्रात धर्मांतर बंदी कायदा आणण्यासाठी सनदशीर मार्गाने येथे तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
२. उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील आपली आस्थापने, घरे आणि सभागृहे ख्रिस्त्यांना न देण्यासाठी जनजागृती करण्याविषयी ठरवण्यात आले.
उल्हासनगर येथील धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
दिनांक – २३ डिसेंबर, वेळ – सायंकाळी – ५ वाजता
स्थळ – भगवंती नावानी स्टेज, संत निरंकारी सभागृहासमोर, गोल मैदान, उल्हासनगर