- अकलेचे तारे तोडणारे भाजपा आमदार बुक्कल नवाब यांना या महान शोधासाठी पुरस्कारच द्यायला हवा ! लाखो वर्षांपूर्वी त्रेतायुगात हनुमंताचा जन्म झाला, तेव्हा मुस्लिम पंथ अस्तित्वात तरी होता का ?
- हिंदुंनो, तुमच्या देवतांविषयी अशी अत्यंत चुकीची विधाने करत असलेल्या राजकारण्यांना जाब विचारा !
लखनऊ : भगवान हनुमान हे मुस्लिम होते. त्यामुळे त्यांच्या नावावरूनच मुस्लिमांमध्ये रेहमान, रमजान, फरमान, झिशान किंवा कुर्बान यांसारखी नावे ठेवली जातात, असे प्रतिपादन भाजपचे आमदार बुक्कल नवाब यांनी गुरुवार केले. यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
बुक्कल नवाब यांनी यापूर्वी लखनौ येथे अल्पसंख्यक मोर्चादरम्यान अयोध्येतील वादग्रस्त स्थळावर मशिद उभारण्याची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. यावेळी त्यांनी हनुमान मुस्लिम होते, असे बोलून नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. ‘हनुमान मुस्लिम होते असे माझ मत आहे. मुसलमानांमध्ये मुलांना रहमान, रमजान, फर्मान, झीशान, कुर्बान यांसारखी जेवढीही नावे ठेवली जातात, ती हनुमानांवरूनच ठेवली जातात’, असे बुक्कल नवाब यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स