हिंदु जनजागृती समितीची धर्मांतरविरोधी मोहीम : धूर्त ख्रिस्त्यांच्या विरोधात हिंदु एकवटले !
उल्हासनगर : येथे नाताळनिमित्त ‘ख्रिश्चन एकता सामाजिक संघटने’च्या वतीने २२ डिसेंबरला काढण्यात येणार्या यात्रेत अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी आणि हिंदु धर्माचा अवमान करणारी पत्रके वाटली जातात. या माध्यमातून हिंदूंचे उघड उघड धर्मांतरच होत असल्याचा धूर्त ख्रिस्त्यांचा कुटील डाव पुढे येत आहे. ‘उल्हासनगर येथे सहस्रो सिंधींचे ख्रिस्त्यांनी फसवून धर्मांतर केल्याने ते थांबण्यासाठी या यात्रेला अनुमती देऊ नये’, अशा आशयाचे निवेदन उल्हासनगर येथील पोलीस उपआयुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांना समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि सिंधी समाज यांतील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांकडून देण्यात आले.
सहभागी संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी !
जय झुलेलाल संघर्ष समितीचे श्री. कमलेश ताराचंदनी, अखिल आरोग्यसेवाचे श्री. प्रदीप दुर्गोया, जय झुलेलाल सोशल ग्रुपचे श्रीमती कोमल पंजाबी आणि काजल बलवानी, हेलपिंग हॅण्ड फाऊंडेशनचे भीष्म असुदानी, विश्व सिंधु सेवा संगमचे अधिवक्ता मोनीष भाटिया, छावा संघटनेचे श्री. निखिल गोळे, उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे श्री. अनिल जग्यासी आणि श्री. परमानंद गिरीजा, समाजसेवक श्री. चंदन तिलोकांनी आणि श्री. शशिकांत दायमा, बजरंग दलाचे श्री. आशिष यादव आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय संभूस, श्री. सागर चोपदार
पोलीस उपायुक्त शेवाळे यांचे हिंदुत्वनिष्ठांना आश्वासन !
‘‘ख्रिस्त्यांनी ध्वनीप्रदूषण केल्यास किंवा धार्मिक भावना दुखावणारी पत्रके वाटल्यास कारवाई करू’’, असे आश्वासन पोलीस उपआयुक्त शेवाळे यांनी या वेळी हिंदुत्वनिष्ठांना दिले.