Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांची मुंबई, ठाणे अन् पालघर जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठांना भेट

सभा, आंदोलने, कार्यशाळा आदी माध्यमांतून राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सक्रीय सहभागी होण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

२३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१८ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांच्या मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांच्या दौर्‍यावर आले होते. या वेळी त्यांनी तीनही जिल्ह्यांतील विविध भागांतील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते, उद्योजक, पत्रकार, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक, सांप्रदायिक आणि स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी यांच्या भेटी घेतल्या. या वेळी एकत्र आलेल्या विविध संघटनांमधील धर्मप्रेमींनी सभा, आंदोलने, कार्यशाळा आदी माध्यमांतून राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या कार्यात सक्रीय सहभागी होण्याचा निर्धार केला. हिंदुत्वनिष्ठांकडून मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद येथे संक्षिप्त स्वरूपात देत आहोत.

संघटितपणे विराट हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याचा सानपाडावासियांचा निर्धार !

सानपाडा येथील प्रस्तावित मशिदीच्या विरोधातील आंदोलनाला हिंदु जनजागृती समितीचा सक्रीय पाठिंबा !

हाताच्या बोटावर मोजता येईल, इतकी मुसलमान लोकवस्ती असूनही येथील बहुसंख्य हिंदूंच्या जनभावनेला डावलून या ठिकाणी सिडको आणि प्रशासन यांनी मशिदीच्या बांधकामाला अनुमती दिली आहे. या विरोधात अखिल सानपाडा रहिवासी महासंघाच्या वतीने सानपाडा येथील धर्मप्रेमी हिंदू प्राणपणानेे लढा देत आहेत. श्री. सुनील घनवट यांनी येथे जाऊन या धर्मप्रेमींची भेट घेतली. श्री. घनवट यांच्या भेटीने उपस्थित धर्मप्रेंमीना स्फूर्ती मिळाली. या वेळी श्री. घनवट यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रस्तावित मशिदीच्या विरोधातील आंदोलनाला सक्रीय पाठिंबा दर्शवला.

सर्वांनी संघटित होऊन विराट हिंदु राष्ट्र-जागृती सभेद्वारे याविषयी जागृती करण्याचा निर्णय घेतला. या वेळी अखिल सानपाडा रहिवासी महासंघाच्या वतीने येथे मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला. या भागात ठिकठिकाणी महाआरती घेऊन याविषयी जनजागृती करण्याचा निर्धार सानपाडावासियांनी केला. या वेळी सर्वश्री कैलाश ताजणे, उमेश चेवुलकर, अजय पवार, बाबाजी इंदोरे यांसह अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.

राष्ट्र-धर्म प्रेमींचा कृतीशील सहभाग ही हिंदु राष्ट्र स्थापनेची नांदीच !

बोईसर येथील उद्योजक १. दिनेश पाठक यांना ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा ग्रंथ देतांना श्री. सुनील घनवट, समवेत बजरंग दलाचे श्री. सुशील तिवारी

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा धर्मकार्यासाठी वेळ देण्याचा निश्‍चय !

पश्‍चिम मुंबईतील सांताक्रूझ, अंधेरी, मालाड यांसह पालघर जिल्ह्यातील भाईंदर, नालासोपारा, बोईसर आणि डहाणू या भागांतील हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, अधिवक्ते, उद्योजक, पत्रकार, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक, संप्रदायिक आणि स्थानिक मंडळांचे प्रतिनिधी यांच्या भेटी घेतल्या. या भागांत ८ ठिकाणी बैठका झाल्या. याला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि धर्मशिक्षणवर्ग यांची उत्स्फूर्तपणे मागणी !

मालाड, अंधेरी, नालासोपारा, भाईंदर, बोईसर या ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभा, तर मालाड, भाईंदर, पालघर, बोईसर आणि डहाणू या ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग आणि धर्मप्रेमींनी राष्ट्र-धर्म विषयी कार्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी नियमित बैठक चालू करण्याची मागणी केली.

सांताक्रूझ येथील हिंदुत्वनिष्ठांचा विविध उपक्रमांत सहभागी होण्याचा निर्धार !

येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. लतींद्र सावंत यांनी स्थानिक स्तरावर विविध हिंदुत्वनिष्ठांना संघटित करून राष्ट्र आणि धर्म जागृतीपर उपक्रमात सहभागी होणार असल्याचे सांगितले. अधिवक्ता मनोज ठाकूर यांनी देवता आणि हिंदु धर्म यांचे विडंबन करणार्‍या चित्रपटांच्या विरोधात याचिका करणे, संबंधित ठिकाणी तक्रारी करणे यांची सिद्धता दर्शवली. पत्रकार कु. भाग्यश्री ठाकूर यांनी ‘पत्रकारितेच्या माध्यमातून हिंदूंवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्याचा प्रयत्न  करीन’, असे सांगितले.

धर्मकार्यासाठी एकत्रित येण्याचा नालासोपारा येथील धर्मप्रेमींचा निश्‍चय !

येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. शिवकुमार पांडे आणि उपस्थित युवक यांनी स्थानिक स्तरावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्रित येऊन राष्ट्रीय हिंदू आंदोलनासह विविध उपक्रमांंमध्ये सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

धर्मप्रचारासाठी अंधेरी येथील धर्मप्रेमी वेळ देणार !

येथील हिंदूरक्षक सेनेचे श्री. अमित पाठक आणि त्यांचे सहकारी यांनी ‘अंधेरी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा निश्‍चित केल्यास सभेच्या प्रचारासाठी सक्रीय सहभाग घेऊ’, असे सांगितले. अंधेरी (पश्‍चिम) येथील भेट घेतलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांनी धर्मशिक्षणवर्ग, आंदोलने आदी उपक्रमांत सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

भाईंदर येथे विविध उपक्रम राबवण्यासाठी धर्मप्रेमी पुढाकार घेणार !

येथील वर्गमित्र संघटनेचे श्री. सुभाष सावंत, श्री. अतुल कण्हेरकर, तसेच भाईंदर (पश्‍चिम) येथील गणेश मंदिराचे पुजारी श्री. दत्तात्रय भटगुरुजी आदी सर्वांनी मीरारोड, भाईंदर येथे धर्मप्रेमींची बैठक घेणे आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणे यांसाठी पुढाकार घेण्याचे ठरवले. भाजपचे स्थानिक प्रतिनिधी श्री. सुंंदर कोणार आणि उद्योजक श्री. प्रसाद गोखले यांनी यांनी स्थानिक उपक्रमात सहकार्य करण्याची सिद्धता दर्शवली.

घाटकोपर येथील बांगलादेशीय घुसखोरांची समस्या आणि हिंदु युवतींना ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवण्याचे षड्यंत्र यांविषयी जागृतीसाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याचा धर्मप्रेमींचा निश्‍चय !

घाटकोपर रेल्वेस्थानकासह आजूबाजूच्या परिसरात अनधिकृतपणे धंदा करणारे बांगलादेशीय व्यापारी आणि फेरीवाले. यांमुळे कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच येथील रेल्वेस्थानक आणि स्काय वॉक यांवर अनेक धर्मांध महाविद्यालयीन हिंदु युवतींसमवेत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यामागे ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र नाही ना, याचा शोध घेऊन जागृती करणे आवश्यक आहे. घाटकोपर येथील स्थानिक धर्मप्रेमी याविषयी जागृती करतच आहेत; मात्र श्री. सुनील घनवट यांनी या धर्मप्रेमींची भेट घेऊन याविषयी संघटितपणे कार्य करण्याची संकल्पना मांडली. याला स्थानिक धर्मप्रेमींकडून त्वरित सहमती मिळाली. यातून ‘बांगलादेशी घुसखोरी’ आणि ‘लव्ह जिहाद’ आदी गंभीर समस्यांविषयी जागृती व्हावी, यासाठी सर्वानुमते हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच आंदोलने, कार्यशाळा आदी माध्यमांतून याविषयी जागृती करण्याचे निश्‍चित करण्यात आले. या बैठकीला सर्वश्री राजू कदम, सुभाष आहीर, दत्तात्रय सानापे, हिमांशु पती, तेजस शिंदे, सुजीत डिसले, राहुल भुजबळ, गणेश मोदी, दिनेश आव्हाड यांसह अन्य धर्मप्रेमी उपस्थिती होते. या बैठकीला हिंदू एकता समिती, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुुस्थान यांसह अन्य संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या भेटीत श्री. सुनील घनवट यांनी हिंदुत्वनिष्ठांना धर्मांतर, लव्ह जिहाद आदी धर्मावरील आघातांची जाणीव, तसेच हिंदु राष्ट्राविषयी जागृती करणारे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रसारीत करण्यात आलेले ग्रंथ भेट म्हणून दिले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *