पोलिसांनी क्षमायाचना करण्यास भाग पाडले !
नवी मुंबई : खारघर परिसरात काही ख्रिस्ती मिशनरी गेल्या अनेक वर्षांपासून ख्रिस्ती पंथाचा प्रचार करत आहेत. खारघर येथे २१ डिसेंबरला हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात अपशब्द बोलणार्या ख्रिस्त्यांना धर्माभिमान्यांनी विरोध केला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार केली. त्या वेळी पोलिसांनी ख्रिस्त्यांना क्षमायाचना करण्यास भाग पाडले.
खारघर येथे नाताळनिमित्त निघालेल्या ख्रिस्त्यांच्या फेरीत धर्मप्रसार करतांना एक ख्रिस्ती मिशनरी धर्माभिमानी श्री. दिनेश चासकर यांना म्हणाले, ‘‘तुमचे देव षंढ आहेत. निष्क्रीय आणि कुचकामी आहेत. तुम्ही आमच्या येशूचा संदेश ऐका आणि आचरणात आणा. तुमचे जीवन सुखी होईल. यासाठी आमची येशूची पुस्तके वाचा. नाकर्त्या, षंढ देवापासून आणि धर्मापासून मुक्त व्हा.’’ असे म्हणून ख्रिस्त्यांनी त्यांच्याजवळील प्रचारसाहित्य बलपूर्वक श्री. दिनेश चासकर यांच्या हातात कोंबले. अशा प्रकारे हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरून धार्मिक भावना भडकावणारा आणि ‘ख्रिस्ती धर्म स्वीकारा’ हे बलपूवर्क सांगण्याचा संतापजनक प्रचार हे ख्रिस्ती करत होते. याला श्री. चासकर आणि तेथे उपस्थित असलेले धर्माभिमानी श्री. गिरीष गुप्ता यांनी प्रखर विरोध करताच या मिशनर्यांनी तेथून पळ काढला.
या प्रकरणी या धर्माभिमान्यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस ठाण्यातत तक्रार देण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी ‘‘तुमच्याकडे काही पुरावा आहे का ?’’ अशी विचारणा केली. धर्माभिमान्यांकडे ख्रिस्त्यांना केलेल्या विरोधाचे ध्वनीचित्रीकरण होते; परंतु ख्रिस्ती प्रत्यक्ष देवतांना अपशब्द बोलत असतांनाचे चित्रीकरण नव्हते. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास असमर्थता दर्शवली.
पोलिसांनी या प्रकरणी धर्माभिमान्यांचे निवेदन स्वीकारले आणि मिशनर्यांच्या प्रमुखाला बोलावून संबंधित ख्रिस्ती प्रचारकांना क्षमायाचना करण्यास भाग पाडले, तसेच कडक शब्दांत त्यांना समज दिली. या वेळी पोलीस ख्रिस्त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या भागात धर्मप्रसार करा. हिंदु हिंदूंच्या भागात धर्मप्रसार करतात. तुम्ही हिंदूंमध्ये धर्मप्रसार करायला कशाला येता ? यापुढे अशा प्रकारे काही झाल्याचे कळल्यास तुमच्यावर गुन्हे नोंदवू.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात