चीन सरकार तेथील परंपरा जपण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेते. या उलट भारतात सार्वजनिक ठिकाणी विनाअनुमती आणि रस्त्यावर वाहतूक रोखून केल्या जाणार्या नमाजपठणावर, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मशिदींमधून भोंग्यांद्वारे बांग देणार्यांवर कारवाई होत नाही ! परंपरा कशी जपायची हे भारत चीनकडून शिकेल का ?
बीजिंग : चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या आदेशानंतर ४ शहरांमध्ये नाताळ साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नाताळ साजरा करण्यासाठी चर्चला केवळ २० सहस्र रुपयेच खर्च करण्याची सूचना देण्यात आली आहे. ‘ही सूचना न पाळल्यास कारवाई करण्यात येईल’, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. या संदर्भात सिंगापूर येथील ‘राजारत्नम् स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’चे चिनी तज्ञ जी यांग यांनी सांगितले की, जेव्हापासून जिनपिंग यांनी सत्ता सांभाळली आहे, तेव्हापासून पारंपरिक सण साजरे करण्यावर सरकारचा भर आहे. पालटत जाणार्या जगात चिनी परंपरा कायम राहावी, यासाठी सरकारने धर्मयुद्धच पुकारले आहे. त्यामुळेच इतर धर्मियांचे सण साजरे करण्यावर सरकारने बंदी घातली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात