अमरावती : हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा अमरावती जिल्ह्यातील वरूडा, दाभा, नांदुरा आणि कुमागड या गावांमध्ये पार पडल्या. हिंदु धर्माची सद्यस्थिती आणि त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व हिंदूंना कळावे या उद्देशाने या सभांचे आयोजन करण्यात आले होते.
चारही ठिकाणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी ते म्हणाले, ‘‘आज पुरोगाम्यांकडून हिंदु धर्मावर चिखलफेक केली जात आहे, विविध सण आणि उत्सव यांच्या माध्यमातून चुकीची माहिती सांगून आपली दिशाभूल केली जात आहे. देवता आणि संत यांची विटंबना चालू आहे आणि हिंदु समाज या गोष्टींना बळी पडत आहे. आतंकवाद, नक्षलवाद, लव्ह जिहाद, गोहत्या यांसारख्या विविध संकटांनी हिंदु धर्माला काजळी आली आहे आणि धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आपले हिंदु यात अडकत आहेत. या सर्व संकटांवर मात करण्यासाठी धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बनून लढले पाहिजे.’’
ठळक
१. कुमागड आणि नांदुरा या गावांमध्ये सभांचे आयोजन, पूर्वसिद्धता तसेच प्रसार या गावातील धर्मप्रेमींनी केला.
२. कुमागड या ठिकाणी एका व्यक्तीने सभा घरी बसून ऐकली आणि सभेच्या अखेरीस ते वक्त्यांसाठी फूल घेऊन आले आणि त्यांच्या पायाला डोके टेकवून नमस्कार केला आणि सभा पुष्कळ आवडल्याचे त्यांनी सांगितले.
३. वरूडा येथे चालणार्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाला येणार्या युवतींनी आणि त्यांच्या पालकांनी प्रसारात उत्स्फूर्त सहभाग घेतला.