हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित प्रयत्न करणे हाच विविध समस्यांवरील एकमात्र उपाय ! : श्री. सतीश कोचरेकर, हिंदु जनजागृती समिती
ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस धर्मांतराचे प्रकार वाढत आहेत. जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विविध प्रलोभने दाखवून ख्रिस्ती धर्मप्रचारक आणि मिशनरी यांच्याकडून हिंदूंचे धर्मपरिवर्तन करण्याचे काम चालू आहे. हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोक ख्रिस्ती मिशनर्यांच्या आमिषाला बळी पडत आहेत, असे मत हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत व्यक्त केले.
येथील कोपरी भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेला आरंभ झाला.
सनातन संस्था ही अध्यात्म आणि हिंदुत्व यांचा प्रचार-प्रसार करणारी संस्था आहे. आजच्या पुरोगामी आणि भ्रष्ट राज्यकर्त्यांना वाटते की, सनातनची मुस्कटदाबी केली, तर हिंदुत्वाचा आणि हिंदु राष्ट्राचा विचार मागे पडेल; पण तसे काही झाले नाही; उलट सनातन संस्थेचे कार्य वेगाने वाढत आहे. आपणही धर्म कार्यासाठी प्रतिदिन एक घंटा देऊन या धर्मकार्यात सहभागी व्हायला हवे. संतांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु राष्ट्र येणारच आहे याची खात्री बाळगा, असे प्रातिपादन सनातन संस्थेच्या वैद्य दीक्षा पेंडभाजे यांनी या वेळी केले.