राममंदिरासह हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अध्यादेश आणायला हवा ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
नवी मुंबई : जगतिक स्तरावर हिंदूंची मुस्कटदाबी होत असल्याने राममंदिरासह हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अध्यादेश आणायला हवा. त्यानंतर अयोध्या, काशी, मथुराच काय तर सर्व चाळीस सहस्र मंदिरे पुनश्च उभारली जातील आणि यासाठी हिंदु राष्ट्र हवे, असे प्रतिपादन श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोपरखैरणे येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते.
सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत म्हणाल्या, ‘‘हिंदूंना धर्मशिक्षण दिले जात नाही, सनातन संस्था ते देऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. ’’
मारुती संकपाळ यांनी त्यांची जागा देऊन या सभेसाठी सहकार्य केले.
विशेष !
१. अनेक हिंदु धर्माभिमानी, तसेच महिला भाषणातील सूत्रे लिहून घेत होते !
२. आढावा बैठकीत घणसोलीतील महिला धर्माभिमानी सहभागी झाल्या होत्या.
उपस्थित मान्यवर !
या प्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक रामदास पवळे, शाखाप्रमुख रामचंद्र शिंदे, शिव प्रतिष्ठानचे राजेश पोवार आणि अस्मित कोंढाळकर, शिवसाधनाचे वैभव पाटील, बजरंग दलाचे साहेबराव गाढवे, भाजपचे शिवाजी जाधव उपस्थित होते, तर नगरसेवक घनश्याम मढवी, गिरीश नंदलाल गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते, तसेच सोपान मेहेर, अध्यक्ष, नवी मुंबई भाजीपाला व्यापारी वेलफेअर असोसिएशन
पोलिसांची हिंदूद्वेषी मनोवृत्ती !
१. पोलिसांनी सभागृह देणार्या व्यवस्थापकाला ‘‘सनातनला कशाला सभागृह दिले ?, ही संघटना बॉम्बस्फोट घडवते, तुला येथे बॉम्बस्फोट घडवायचा आहे काय ?’’, अशी भीती दाखवली.
२. कोपरखैरणे येथील गुप्त शाखेतील आठ ते दहा पोलीस या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि ते कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण करत होते. सूत्रसंचालकांनी सूचना देऊनही पोलिसांनी ध्वनीमुद्रण केले.
३. पुढील होणार्या आढावा बैठकीसाठी आपण ‘मंदिराची अनुमती काढलेली प्रत आम्हाला मिळेल का ?’ अशी पोलिसांनी विचारणा केली. याआधीही कोपरखैरणे पोलिसांनी राष्ट्रीय हिंदु आंदोलनाची अनुमती जाणीवपूर्वक अडकवून अनुमती देण्याचे तीन वेळा टाळले आहे.