बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार चालूच !
- भारतात असुरक्षित वाटत असल्याचे सांगणारे आमीर खान, नसीरुद्दीन शाह, जावेद अख्तर यांसारखे अभिनेते आणि लेखक यांना पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या मुसलमानबहुल देशांतील हिंदूंची स्थिती दिसत नाही का ? याविषयी ते तोंड का उघडत नाहीत ? यांना भारतात असुरक्षित वाटते, तर ते या मुसलमानबहुल देशात का जात नाहीत ?
- पाक आणि बांगलादेश येथे सातत्याने हिंदूंचा वंशसंहार होत असतांना काँग्रेस निष्क्रीय होती, तर भाजपनेही गेल्या साडेचार वर्षांत काँग्रेसचीच री ओढली आहे. ही स्थिती पालटून जगभरातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !
ढाका : बांगलादेशमध्ये ३१ डिसेंबरला सार्वजनिक निवडणुका होणार आहेत. येथे पुन्हा एकदा धर्मांधांकडून हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. बांगलादेशातील ठाकुरगाव जिल्ह्यातील झापरतलाई गावामध्ये आनंदाचंद्र बर्मन यांचे घर धर्मांधांकडून पेट्रोल ओतून जाळण्यात आले. गेल्या काही दिवसांतील ही अशा प्रकारची हिंदूंच्या विरोधातील तिसरी घटना आहे.
या घटनेविषयी आनंदाचंद्र बर्मन म्हणाले की, अवघ्या ५ ते ७ मिनिटांत आमचे घर जाळण्यात आले. हिंदूंना घाबरवण्यासाठी, तसेच आम्ही निवडणुकीत मतदान करून नये; म्हणून आमचे घर जाळण्यात आले. अखनगर संघ परिषदेचे अध्यक्ष नुरुल इस्लाम यांनी ‘हिंदूंच्या घरांना आग लावणार्यांवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी चालू केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात