हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला आमचे समर्थन ! – सभेला उपस्थित धर्मप्रेमींची ग्वाही
कणकवली : तालुक्यातील तरंदळे येथील ग्रामदेवता श्री टेवणादेवी मंदिराच्या प्रांगणात हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेस धर्माभिमानी हिदूंचा चांगला प्रतिसाद लाभला. या वेळी सनातनचे डॉ. संजय सामंत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. भरत राऊळ यांनी राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांची सद्यःस्थिती आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वक्त्यांनी ओजस्वी वाणीत केलेल्या मार्गदर्शनामुळे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी उपस्थित धर्माभिमानी हिंदूंनी उत्स्फूर्तपणे घोषणा देत समितीच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला समर्थन दिले.
जात आणि संप्रदाय यांसाठी एकत्र येणारे हिंदु धर्मासाठी कधी एकत्र येणार ? – डॉ.संजय सामंत
या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी साधनेची आवश्यकता या विषयावर डॉ.सामंत म्हणाले,स्वातंत्र्यपूर्व काळात धर्माचरण हा हिंदूंच्या एकतेचा पाया होता.मेकॉलेने याचा अभ्यास करून हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी धर्माचा अभाव असलेली शिक्षणपद्धत सिद्ध केली.भारताची फाळणी झाली,तेव्हा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र्र निर्माण झाले;परंतु राहिलेल्या बहुसंख्य हिंदूंचे हिंदु राष्ट्र घोषित न होता त्याला निधर्मी राष्ट्र घोषित करण्यात आले.तेव्हापासून सर्वस्तरांवर हिंदु धर्माला फाटा देण्यात आला.हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्थाच मोडून पडली.त्यामुळे हिंदू धर्मचरणापासून वंचित झाले आणि धर्माभिमान शिल्लक राहिला नाही.त्यामुळे प्रतिवर्षी १०.५० लाख हिंदूंचे धमार्ंतर केले जाते.हिंदूंनाच हिंदु म्हणवून घ्यायची लाज वाटते.त्यामुळे दिवसेंदिवस हिंदु बांधव आणि हिंदु धर्मावर आघात होत आहेत.हिंदु जात,संप्रदाय यांसाठी एकत्र येतात;पण हिंदु धर्मासाठी एकत्र येत नाहीत.आपल्याच धर्माचे विडंबन करतांना हिंदूूंना काही वाटत नाही.त्यासाठी आपण हिंदु धर्माचे महत्त्व जाणून त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे.त्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था धर्मशिक्षण वर्ग घेते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ख्रिस्त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जाणार्या हिंदूंची वाढती संख्या ! – भरत राऊळ
या वेळी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि निधर्मी लोकशाहीची निरर्थकता याविषयी मार्गदर्शन करतांना श्री.भरत राऊळ म्हणाले,देशात हिंदूंची संख्या १०० कोटींहून अधिक आहे;परंतु ही संख्या हे हिंदूंचे बळ नसून दृढ संघटनात बळ असतेे.पांडव आणि छत्रपती शिवराय यांच्या उदाहरणावरून हे लक्षात येतेे.दुर्दैव म्हणजे आपण राष्ट्र आणि धर्म यांप्रतीची कर्तव्ये विसरलो आहोत.देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केल्याने हिंदूंची खूप मोठी हानी झाली आहे.हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्याने धर्मावर विविध आघात होत असूनही,तो संघटितपणे विरोध करतांना दिसत नाही.हिंदूंनी मंदिरांत अर्पण केलेला पैसा अन्य पंथांच्या संस्थांना वाटला जातो.आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ख्रिस्त्यांची २०० प्रार्थनास्थळे आहेत.या प्रार्थनास्थळांमध्ये जाणारे बहुसंख्य हिंदूच आहेत.इतर धर्मीय त्यांच्या धर्माचा अभिमान बाळगून लाभ उठवत आहेत.वर्ष १९४७ मध्ये एक रुपयाचे कर्ज नसलेल्या या देशातील नागरिकांवर आता प्रत्येकी ३३ सहस्र रुपयांचे कर्ज आहे.प्रत्येक १२ घंट्याला एक शेतकरी आत्महत्या करतो,प्रती ३२ मिनिटांनी बलात्कार होतो.लव्ह जिहाद,गोहत्या आदी संकटे आपल्यासमोर आ वासून उभी आहेत.
सभा चालू होण्यापूर्वी धर्मप्रेमी तथा श्री टेवणादेवी मंदिर समितीचे अध्यक्ष श्री.जयसिंग नाईक यांचा सत्कार वक्ते डॉ.संजय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.सभेसाठी मंदिराचे प्रांगण आणि ध्वनीयंत्रणा श्री.जयसिंग नाईक यांनी उपलब्ध करून दिली.सभेचा प्रचार श्री.दीपक माळगावकर आणि श्री.प्रवीण घाडीगावकर यांनी चांगल्या प्रकारे केला.सभेला सरपंच सौ.नम्रता देऊलकर उपस्थित होत्या.सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन अधिवक्त्या कु.स्मिता देसाई यांनी केले.