मंदिरांचा पैसा धर्मकार्यासाठीच वापरला जावा, असे धर्मशास्त्र सांगते. अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांचा पैसा घेण्याचे धैर्य महाराष्ट्रातील सरकार का दाखवत नाही ? सरकारी कार्यालयात देवतांच्या प्रतिमांना विरोध करणार्यांना मंदिरांचा पैसा का लागतो ?
मुंबई : नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांसाठी ५०० रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी २५ कोटी रुपयांचे अनुदान देण्यास महाराष्ट्र सरकारने शिर्डी येथील साईबाबा संस्थान न्यासाला अनुमती दिली आहे. या न्यासाच्या साहाय्याने आरोग्य क्षेत्र आणि रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत असणार्या नोंदणीकृत संस्था यांना अनुदान दिले जाणार आहे. प्रत्येक रुग्णवाहिकेस ५ लाख रुपये यांप्रमाणे ५०० रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी २५ कोटी रुपये दिले जातील. यासाठी संबंधित संस्थांना साईबाबा संस्थान न्यासासह करार करावा लागेल, असे विधी आणि न्याय विभागाने सरकारी आदेशात म्हटले आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागांत रुग्णांना तात्काळ चिकित्सा सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नोंदणीकृत संस्थांना रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी निधी व्यय करण्यासाठी मान्यता मिळण्यासाठी संस्थानने सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात