केरळ सरकारने मशिदींमध्ये महिलांना प्रवेश मिळण्यासाठी कधी अशी मानवी साखळी का केली नाही ?
कोची (केरळ) : सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय दिला असला, तरी भाविकांच्या विरोधामुळे अद्याप १० ते ५५ वयोगटातील एकही महिला मंदिरात प्रवेश करू शकलेली नाही.
मंदिर प्रशासन, हिंदु संघटना आणि भाविक महिला मंदिर प्रवेशाला विरोध करत आहेत. तर दुसरीकडे काही अन्य धर्मीय महिला, निधर्मीवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांसारखे हिंदुविरोधी घटक मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी आंदोलन करत आहेत. याच अनुषंगाने केरळ सरकारने १ जानेवारीला राज्यातील कासारगोड जिल्ह्यापासून थिरुवनंतपुरमपर्यंत महिलांची मानवी साखळी बनवली. कसारगोड येथे आरोग्यमंत्री श्यालजा आणि थिरुवनंतपूरम् येथे माकपच्या नेत्या वृंदा करात यांनी साखळीचे प्रतिनिधित्व केले. काही दिवसांपूर्वी सरकारच्या या साखळीला विरोध करण्यासाठी, तसेच मंदिर प्रवेशाच्या विरोधात हिंदु संघटनांनी राज्यात ७०० हून अधिक किलोमीटर अंतराची मानवी साखळी केली होती. या वेळी त्यांनी हातात दिवे घेतले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात