Menu Close

सनातन संस्था करत असलेले अध्यात्मप्रसाराचे कार्य प्रशंसनीय : राकेशगिरीजी महाराज, मध्यप्रदेश

प्रयागराज येथील सनातनच्या प्रदर्शनाच्या निर्मितीचे कार्य चालू असतांनाच दोन संतांची भेट !

डावीकडून स्वामी राममुनीजी महाराज आणि राकेशगिरीजी महाराज (उजवीकडे)

प्रयागराज (कुंभनगरी) : उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे जानेवारी २०१९ मध्ये होणार्‍या कुंभमेळ्यात अध्यात्मप्रसारासाठी सनातन संस्थेच्या वतीने प्रदर्शन मंडपाची उभारणी चालू आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी प्रदर्शन मंडप उभारणीची सेवा चालू असतांना तेथे भगवे वस्त्र घातलेल्या दोन संतांचे आगमन झाले. त्यात हरिद्वार येथील श्री संत मंडळाचे स्वामी राममुनीजी महाराज आणि मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्याचे राकेशगिरीजी महाराज होते. प्रारंभी त्यांनी मंडपाच्या उभारणीविषयी चौकशी केली. त्या वेळी तेथे सेवेसाठी असलेले सनातनचे साधक श्री. सोनराज सिंह यांनी ‘कुंभमेळ्यात प्रदर्शनाच्या माध्यमातून सनातन संस्था धर्मशास्त्र आणि साधना लोकांना सांगणार आहे’, अशी माहिती त्यांना दिली.

या वेळी राकेशगिरीजी महाराज म्हणाले, ‘‘कर्म हे देवासाठी केले आणि तेही भक्ती करत केले तर ते अधिक लाभदायक ठरते. तुम्ही इतक्या लहान वयात सर्व सोडून जे धर्मशास्त्र आणि साधना सांगण्याचे काम करत आहात ते चांगले आहे. हे कार्य कोणालाही करणे शक्य नसते. विशिष्ट लोक यासाठी निवडले जातात.’’

क्षणचित्रे 

१. या वेळी ते संत बराच वेळ तेथे थांबलेले होते. साधकांशी बोलत होते. प्रदर्शनाच्या मंडपाची उभारणी पाहून राकेशगिरीजी महाराज म्हणाले, ‘‘तुम्ही पुष्कळ चांगले काम करत आहात.’’

२. राकेशगिरीजी महाराज यांनी गळ्यात घातलेल्या रूद्राक्षांच्या माळेच्या मध्यभागी सनातननिर्मित श्री दत्तात्रेय देवतेचे पदक होते. याविषयी त्यांना ‘‘सनातनने अशी देवतांची सात्त्विक चित्रे रेखाटली आहेत.’’, असे सांगितले. त्यानंतर त्यांना आणखी आनंद झाला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *