- प्रभु श्रीरामचंद्र यांचा ‘दारूडा’ आणि ‘मांसाहारी’ असा पुस्तकात उल्लेख
- तक्रार नोंदवण्यास गेलेल्या अधिवक्त्यांचा अवमान
मडिकेरी (कर्नाटक) : येथील अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे उपाध्यक्ष अधिवक्ता अमृतेश एन्.पी. हे मडिकेरी आणि मैसूरू नगर पोलीस ठाण्यात हिंदुद्रोही कन्नड लेखक प्रा. के.एस्. भगवान यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यास गेले असता पोलीस अधिकार्यांनी त्यांच्याशी उद्धटपणे बोलत त्यांचा अवमान केला. या घटनेविषयी अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांनी या पोलीस ठाण्याबाहेर वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना माहिती दिली.
ते म्हणाले,
१. हिंदुद्रोही लेखक भगवान यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात श्रीराम, माता सीता आणि मोहनदास गांधी यांच्याविषयी अवहेलनात्मक लिखाण केले असल्याचे वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजले. त्यामुळे मी तक्रार प्रविष्ट करायला आलो आहे. माझे आरोग्य चिंताजनक असूनही माझ्या धार्मिक भावनांना धक्का बसल्याने तक्रार प्रविष्ट करण्यास आलो आहे; (अशा धर्माभिमानी अधिवक्त्यांकडून हिंदूंनी आदर्श घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) परंतु पोलीस ठाण्यात ते स्वीकारण्यास कोणी नसल्याने पोलीस ठाण्यातच वाट पहावी लागली. (काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षांच्या युती सरकारच्या राज्यात पोलिसांचा कारभार कसा चालतो, हे ही घटना दर्शवते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) नंतर ठाणे अंमलदार षण्मुख यांनीच दूरभाष करून तक्रारीविषयी विचारणा केली. त्यांना थोडक्यात माहिती सांगून ‘मी तक्रार लिहून आणली आहे, माझी प्रकृती बरी नसल्याने कृपा करून तुम्ही ठाण्यात त्वरित येऊन तक्रार स्वीकारावी’, अशी विनंती केली. त्यावर ‘तू जाऊन मर’ असे मला षण्मुख यांनी उद्धटपणे सांगितले. (अधिवक्त्यांविषयी असे उद्धटपणे बोलणारे पोलीस सामान्य लोकांशी कसा व्यवहार करत असतील, याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) षण्मुख यांच्या वर्तनाविरोधात काही अधिवक्त्यांनीही तक्रारी केल्या आहेत. सामान्य लोकांकडे कर्नाटक सरकार अशा दृष्टीने पहाते का ? नागरिकांनी दिलेल्या कराच्या पैशातून वेतन प्राप्त करणार्या पोलीस अधिकार्यांचा हा उद्धटपणा योग्य आहे का ?
२. या वेळी अधिवक्ता अमृतेश म्हणाले की, हा विषय राज्यस्तरावर हाताळण्यात येईल. अधिवक्त्यांशी अशा भाषेत बोलणारे सामान्य नागरिकांशी कसे वर्तन करत असतील ? प्रा. भगवान यांनी धार्मिक भावना दुखावणारे भाष्य केले असल्याने आमची तक्रार स्वीकारून धार्मिक भावना दुखावल्याविषयी कलम २९५ अ प्रमाणे गुन्हा नोंदवून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी.
अधिवक्ता उमाशंकर मेगुंडी यांचे मैसुरूच्या जयलक्ष्मीपुरम् पोलीस ठाण्यात के.एस. भगवान यांचा जामीन रहित करण्याविषयी निवेदन
के.एस्. भगवान यांना मैसुरूच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या आधी देवतांचा अवमान केल्यावरून सप्टेंबर २०१८ मध्ये सशर्त जामीन दिला आहे. आता पुन्हा भगवान यांनी या अटींचे उल्लंघन करत ‘राममंदिर कशाला हवे ?’ या पुस्तकात जाणीवपूर्वक प्रभु श्रीरामचंद्र, माता सीता आणि गांधी यांच्याविषयी अवमानास्पद लिखाण केले आहे. न्यायालयाने भगवान यांना ‘असे बोलू नये’, अशी अट घालून जामीन दिला आहे; परंतु भगवान पुनःपुन्हा असे भाष्य करत असून पोलिसांकडून त्यांचा जामीन रहित करण्याविषयी काही कारवाई झाली नाही. ही व्यक्ती हिंदूंच्या धार्मिक भावनांना धक्का बसेल आणि हिंसाचार होईल, या उद्देशानेच भाष्य करत आहे. त्यामुळे न्यायालयाने भगवान यांना दिलेला सशर्त जामीन रहित करावा, अशी विनंती कर्नाटक उच्च न्यायालयाचे अधिवक्ता उमाशंकर मेगुंडी यांनी मैसुरूच्या जयलक्ष्मीपुरम् पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे. जर काही कारवाई करण्यात आली नाही, तर संबंधित अधिकार्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्यासाठी पुढील पावले उचलली जातील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कर्नाटक पोलिसांची मोगलाई !
नोव्हेंबर २०१८ मध्ये टिपू सुलतानशी संबंधित कार्यक्रमात कथित धार्मिक भावना दुखावल्याचे भाषण केल्याच्या आरोपाखाली पत्रकार श्री. संतोष तम्मय्या यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट झाल्यावर त्यांना रातोरात अटक करण्यात आली होती; परंतु हिंदूंच्या भावना पुनःपुन्हा दुखावणारे आणि सध्या जामिनावर असलेले के.एस्. भगवान यांच्याविरुद्ध पोलिसांकडून काहीच कारवाई होत नाही, एवढेच नव्हे, तर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात येते, हे कर्नाटकमध्ये मोगलाई चालू असल्याचे दर्शक आहे.
हिंदुद्रोही लेखक भगवान यांच्या विरोधात गुन्हा नोंद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदु जागरण वेदिकेचे मैसूरूचे जिल्हाध्यक्ष जगदीश हेब्बार यांनी केलेल्या तक्रारीनंतर येथे हिंदुद्रोही लेखक भगवान यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्यावरून कलम २९५ अ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
Any Non Muslim Girl trying to go with a Muslim Guy must read…http://loveandjihad.blogspot.com