वाढत्या पाश्चात्त्यिकरणामुळे जन्महिंदू धर्मशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे प्रत्येक मंदिर व्यवस्थापनाने मंदिरात प्रवेश करणार्या भाविकांना पारंपरिक पोषाख परिधान करणे बंधनकारक करणे आवश्यक !
भाग्यनगर : आंध्रप्रदेशमधील श्री दुर्गा मल्लेश्वर स्वामी मंदिरात येणार्या महिलांना कोणता वेश परिधान करावा, याविषयीचे नियम घालण्यात आले आहेत. या नियमांनुसार मंदिरात प्रवेशासाठी तेथील पारंपरिक साडी परिधान करणे आवश्यक असेल. महिला भाविकांना १०० रुपयांत साडी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ख्रिस्ती नववर्षांत मोठ्या संख्येने मंदिरात भाविक येतात. त्यामुळे आम्ही नवीन वर्षातच हा नियम लागू केला आहे. (हिंदूंच्या नव्हे, तर ख्रिस्ती नववर्षांत हिंदू मोठ्या संख्येने मंदिरात येतात, हा त्यांना धर्मशिक्षण न मिळाल्याचा परिणाम ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
‘१ जानेवारीपासून जिन्स, स्कर्ट आणि शॉटर्स् परिधान करून येणार्या मुली आणि महिला यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही’, असे मंदिराच्या कार्यकारी अधिकारी कोटेशवरम्मा यांनी सांगितले.
१. कोटेश्वरम्मा म्हणाल्या, ‘‘मंदिरात होणार्या सर्व विधींमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कनक दुर्गा अम्मावरूंच्या दर्शनासाठी मंदिरात मिळणारे कपडे परिधान करण्यास अनुमती दिली जाईल.’’
२. तिरुमला मंदिरात अवलंबण्यात येणार्या हिंदु परंपरेत एकरूपता आणण्यासाठी हा आदेश पारित करण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात