नंदुरबार : जिल्ह्यातील घोटाणे या गावात १ जानेवारी या दिवशी हिंदु-राष्ट्र जागृती सभा पार पडली. सभेला सनातन संस्थेचे डॉ. सतीश बागुल आणि हिंदु जनजागृती समितीचे नंदुरबार सेवक डॉ. नरेंद्र पाटील यांनी संबोधित केले.
डॉ. बागुल यांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर आपले विचार मांडले. यात त्यांनी धर्माचरणाचे महत्त्व, सणांचे होणारे विकृत स्वरूप, देवतांचे होणारे विडंबन, कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, वाढदिवस हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे कसा साजरा करावा ? हे विषय मांडले. डॉ. पाटील यांनी हिंदु धर्मावर अन् हिंदूंवर होणारे आघात आणि ‘धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्यक्ष कृतीची दिशा’ या अंतर्गत लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, गोहत्या, हिंदूसंघटन या विषयांवर त्यांचे विचार मांडले. तसेच त्यांनी गावातील गोवंश कसायाला न विकण्याचे आवाहन केले. सभेला २०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. गावातील ७०-८० तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात सभेपूर्वी गावातून निमंत्रण फेरी काढली.
हिंदु राष्ट्रस्थापनेची प्रतिज्ञा जितेंद्र मराठे यांनी घेतली. सभेला श्रीराम ब्रिगेडचे धर्मप्रेमी विनायक धनगर, कुणाल गोसावी, योगेश पाटील, राहुल पाटील, शुभम भावा, शुभम धनगर, नंदू गोसावी, पप्पू धनगर, बंटी धनगर, उज्ज्वल धनगर, तसेच स्वदेशी जागरण मंचचे कपिल चौधरी, धीरज चौधरी, मयूर चौधरी यांचे सहकार्य लाभले.
सहकार्य !
१. जनता विद्यालयाने पोडीयम आणि टेबल उपलब्ध करून दिले.
२. मयूर मंडपाचे मालक श्री. पांडुरंग धनगर यांनी ध्वनीक्षेपणासह सर्व मंडप साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले.
विशेष प्रतिसाद !
१. सभा ऐकून एका धर्मप्रेमीने दोंडाईचा येथेही सभा घेण्याची मागणी केली.
२. ‘गावात कसाई प्रवेश बंदी करा’, असे आवाहन सभेत केले होते. त्याचा परिणाम म्हणून दुसर्या दिवशी घोटाणे गावात एक कसाई गोवंश घेण्यासाठी आला असता त्याला गावातील तरुणांनी पिटाळले.