- हिंदुद्वेषी माकप सरकारच्या राज्यातील पोलिसांकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ?
- केरळमध्ये पोलीस संरक्षणात कशा प्रकारे हिंदुद्रोही कारवाया चालू आहेत, हे यातून दिसून येते !
थिरूवनंतपूरम् : केरळच्या कायीक्कोड येथील निवासी आणि माकपच्या कार्यकत्या बिंदू आणि मलप्पूरम् येथील निवासी कनकदुर्गा शबरीमला मंदिरात जाण्याच्या ४ दिवस आधीच मंदिरापासून काही घंट्याच्या अंतरावर असणार्या विराजपेटे येथे पोलिसांच्या सुरक्षेत पोहोचल्या होत्या. त्या तेथील एका लॉजमध्ये २ दिवस थांबल्या होत्या आणि नंतर त्या तेथून मंदिरात गेल्या. येतांना आणि जातांना पोलीस त्यांच्या सोबत होते, असे या लॉजच्या सीसीटीव्हीतील चित्रीकरणातून उघड झाले आहे. तसेच त्यांनी भगवान अय्यप्पा यांचे व्रतही केले नव्हते, हेही यातून लक्षात आले आहे.
१. या दोन्ही महिला २९ डिसेंबरला दुपारी २ वाजता केरळ राज्याच्या बसमधून विराजपेटे येथे आल्या. नंतर त्यांना येथील दोड्डट्टी चौकात असलेल्या ‘लॉज’मध्ये ‘बिंदू’ या नावाने खोली घेतली. त्यांच्यासह केरळ पोलीस कर्मचारी होते. महिलांना लॉजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचल्यावर ते तिथून परत गेले.
२. बिंदू आणि कनकदुर्गा याच लॉजमध्ये २ दिवस होत्या. बाहेर कुठेही न जाता खोलीमध्येच जेवण आदी मागवत होत्या. त्या ३१ डिसेंबरला खोली रिकामी करून गेल्या. त्यांनी येतांना रंगीत कपडे परिधान केले होते. जातांना मात्र त्यांनी काळे कपडे परिधान केले होते. मंदिरात जाण्यासाठी करण्यात येणार्या व्रतानुसार ४० दिवस काळे कपडे परिधान करावे लागतात. ‘अय्यपा मंदिरात महिलांनी प्रवेश केला’, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्यावर लॉजच्या मालकाला संशय आला. त्याने लॉजमधील सीसीटीव्हीचे चित्रीकरण पडताळल्यावर २ दिवस लॉजमध्ये वास्तव्य करणार्या महिलांनीच मंदिरात प्रवेश केल्याचे उघड झाले.
३. याविषयी लॉजचे मालक हरिहर सीतालक्ष्मी म्हणाले, ‘‘या दोन्ही महिला कोणतेही व्रत करत नव्हत्या. लॉजमधून जातांनाच काळे कपडे धारण केल्याचे सीसीटीव्हीच्या दृश्यातून लक्षात येते. तसेच केरळ सरकारने पोलिसांचा वापर करून या महिलांना शबरीमला मंदिरात पाठवल्याचे निश्चित स्पष्ट होते. विराजपेटे येथून शबरीमला काही घंट्यांच्या अंतरावर आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही महिलांना केरळ पोलिसांनी विराजपेटेत आणून ठेवले. त्या दोन्ही महिलांना केरळ पोलिसांनीच आमच्या लॉजमध्ये सोडून नंतर तेच घेऊन गेले. ही दृश्ये आमच्या हॉटेलच्या सीसीटिव्हीत दिसत आहेत. देवळात प्रवेश करणार्या त्या महिला कोणतेही व्रत करत असल्याचे दिसले नाही.’’
श्रीलंकेतील ४६ वर्षीय महिलेनेही शबरीमला मंदिरात जाऊन दर्शन घेतले
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या नावाखाली केरळमधील माकप सरकार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहे, हे लक्षात घेऊन भाजप सरकारने न्यायालयाच्या निर्णयावर रोख लावण्यासाठी अध्यादेश काढायला हवा !
कोची : ३ जानेवारीच्या रात्री एका ४६ वर्षीय श्रीलंकेतील शशीकला नावाच्या महिलेनेही शबरीमला मंदिरात जाऊन भगवान अय्यपा यांचे दर्शन घेतल्याचे समोर आले आहे. या दर्शनाची चित्रफीत सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाली आहे; मात्र या महिलेने ‘मला पोलिसांनी दर्शन घेऊ दिले नाही’, असे म्हटले आहे.
शबरीमला प्रकरणी आंदोलन करणार्या ७४५ जणांना अटक
थिरुवनंतपूरम् : नास्तिकतावादी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कार्यकर्ती बिंदू आणि अन्य एक महिला कनकदुर्गा यांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ ३ जानेवारीला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांनी पुकारलेल्या केरळ बंदमध्ये काही ठिकाणी हिंसाचार झाला. या प्रकरणी पोलिसांनी ७४५ जणांना अटक केली आहे. या हिंसाचारात १०० जण घायाळ झाले होते.
भाजपच्या ३ कार्यकर्त्यांना भोसकले
बंदच्या वेळी हिंसाचार करणार्या जिहादी संघटनांवर केरळ सरकार कारवाई का करत नाही ? असे आक्रमण एखाद्या निधर्मीवादी आणि पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कोणी केले असते, तर एव्हाना ती राष्ट्रीय बातमी ठरली असती !
त्रिशूरमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी आतंकवादी संघटनेची राजकीय आघाडी असलेल्या ‘सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’च्या (एसडीपीआयच्या) कार्यकर्त्यांशी उडालेल्या चकमकीत भाजपच्या ३ कार्यकर्त्यांना भोसकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात